शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

Shivsena vs Eknath Shinde Live: गुवाहाटीत शिंदे गटाच्या महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 22:52 IST

मुंबई :  शिवेसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता राज्यातील राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली ...

28 Jun, 22 10:53 PM

शिंदे गटाची महत्त्वाची बैठक सुरू

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र दिल्यानंतर गुवाहाटीत एकनाथ शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

28 Jun, 22 09:53 PM

भाजप राज्यपालांना बहुमत चाचणीसाठी पत्र देणार

भाजपचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणीसाठी पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येणार आहे. 

28 Jun, 22 09:42 PM

भाजप नेते राजभवनाच्या दिशेने रवाना

सागर बंगल्यावरील बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील राजभवनावर दाखल झाले आहेत. 

28 Jun, 22 08:03 PM

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा परत येण्याचे आवाहन केले आहे: आदित्य ठाकरे

28 Jun, 22 08:03 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना आवडत आहे: आदित्य ठाकरे

28 Jun, 22 08:03 PM

देशात लोकशाही आहे की नाही, हाच मोठा प्रश्न: आदित्य ठाकरे

28 Jun, 22 08:02 PM

मी कधी कोणावर टीका केली नाही: आदित्य ठाकरे

28 Jun, 22 05:22 PM

बाळासाहेबांची सेना आणि भारतीय सेना दोनच सेना आता अस्तित्वात: संजय राऊत
 

28 Jun, 22 05:22 PM

शिवसेना आहे त्या जागेवरच आहे: संजय राऊत

28 Jun, 22 05:22 PM

आता हे गद्दार पुन्हा रस्त्यावर फिरायला नकोत: संजय राऊत

28 Jun, 22 05:22 PM

बहुमत असेल तर लपून का बसला आहात?: संजय राऊत

28 Jun, 22 05:22 PM

आम्हाला हिंदुत्व शिकवू नका: संजय राऊत

28 Jun, 22 05:16 PM

या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित असल्याचा आनंद: संजय राऊत

28 Jun, 22 05:16 PM

गुवाहाटीच्या जेलमध्ये जाऊन बसलेत; संजय राऊतांचा शहाजी बापू पाटील यांना खोचक टोला

28 Jun, 22 05:15 PM

आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे: संजय राऊत

28 Jun, 22 05:15 PM

मला आनंद झाला की, अलिबाग पुत्र म्हणून माझा उल्लेख केला: संजय राऊत
 

28 Jun, 22 04:45 PM

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एखादा मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

28 Jun, 22 04:37 PM

मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार आहोत: सुहास कांदे

आमच्यावर कुणाचाही दबाव नाही. आम्ही सर्व जण इथे हसत खेळत राहत आहोत. तसेच एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. हिंदुत्वासाठी आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार आहोत. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असे सुहास कांदे यांनी यावेळी नमूद केले आहे. 

28 Jun, 22 04:36 PM

हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत: सुहास कांदे

हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी एकनाथ शिंदेंसोबत थांबलेलो आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत, असे स्पष्टीकरण सुहास कांदे यांनी दिले आहे. 

28 Jun, 22 04:33 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शेवटची कॅबिनेट?

थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार असून, कदाचित ही त्यांची शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

28 Jun, 22 04:04 PM

विकास निधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला - शहाजी पाटील  

माझ्या सांगोला मतदारसंघातील विकास निधी काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी जाणीवपूर्वक रोखला. महाविकास आघाडीला आमचा विरोध आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत. आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये ही विनंती, असे आवाहन बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी केले आहे.

28 Jun, 22 03:15 PM

तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करू - चंद्रकांत खैरे

जालना : 2 दिवसांत तुम्हांला यायचं असेल तर परत या नाहीतर तुमची हकालपट्टीच काय सगळीच पट्टी करून टाकू, असा इशारा शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर आमदारांसह दीपक केसरकर यांना दिला आहे. दीपक केसरकर हे गद्दार असल्याचे देखील चंद्रकांत खैरे म्हणाले.

28 Jun, 22 03:03 PM

गुवाहाटीत बसलेल्या नेत्यांनी परत यायला हवं - महेश तपासे  

गुवाहाटीत बसलेल्या नेत्यांनी आपल्या मतदार संघात परत यायला हवं. डोंगर, दरी, कडे, कपाऱ्यांचा आस्वाद घेत आहेत, त्यांनी परत येऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन महेश तपासे यांनी बंडखोर आमदारांना केले आहे. 

28 Jun, 22 02:54 PM

महाराष्ट्राच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा करावा -  रामदास आठवले

शिवसेनेचे ४० हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आता बहुमत भाजप, एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे  महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा लवकर करावा, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

28 Jun, 22 02:42 PM

एकनाथ शिंदेंच्या बंडाचा पहिला फटका; मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी

एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. ठाण्यात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे आता पक्षविरोधी कारवायाचं कारण देत ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. 

28 Jun, 22 01:25 PM

आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत - एकनाथ शिंदे 

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या गेटवर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिले. 'आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा, असे एकनाथ  शिंदेंनी म्हटले आहे.

28 Jun, 22 01:25 PM

शिंदे वगळता कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही - उदय सामंत 

एकनाथ शिंदे वगळता कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नाही. गैरसमजाला बळी पडू नका. आजही आपण शिवसेनेसोबतच आहोत. स्वखुशीने गुवाहाटीला आलो आहे, असे बंडखोर मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

28 Jun, 22 01:20 PM

शिवसैनिकांमुळे शिवसेना उभी आहे, टिकून आहे, लढत असते  - संजय राऊत 

नवी मुंबई :  माथेरान संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या भेटीसाठी संजय राऊत कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आले होते. यावेळी सरकार आपल्या पाठीशी असल्याचा धीर त्यांनी प्रसाद सावंत यांना दिला. तसेच, प्रसाद सावंत यांची तब्येत ठीक असून उद्या त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार आहे. शिवसैनिकांमुळे शिवसेना उभी आहे, टिकून आहे, लढत असते असे संजय राऊत म्हणाले. 

28 Jun, 22 01:16 PM

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप वरिष्ठ नेत्यांसोबत तातडीची बैठक असून राज्यातील सत्तासंघर्षावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत मोठ्या घडामोडींचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.

28 Jun, 22 01:12 PM

फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय? - दीपक केसरकर

देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध मित्रत्त्वाचे आहेत. मी रात्री 12 वाजताही देवेंद्र फडणवीसांना फोन केला तरी ते माझा फोन घेतात. केवळ भाजपचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाहीत. तर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही अतिशय चांगले आहेत, असे म्हणत आम्ही फडणवीस यांची मदत घेतली तर चुकीचं काय, असा थेट सवाल  दीपक केसरकर यांनी विचारला आहे.

28 Jun, 22 01:12 PM

"राहण्याचा खर्च आम्ही करू शकत नाही का?" 

गुवाहाटीतील आमच्या हॉटेलचा खर्च कोण करतं, या प्रश्नावरुनही बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली. आम्ही आमदार आहोत, आम्हाला चांगल्या पगारी आहेत. मग आमचा राहण्याचा खर्च आम्ही करू शकत नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. तसेच, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठीही आम्ही मुंबईतील फाईव्हस्टार हॉटेलमध्ये राहत होतो. त्यावेळी, आमच्या राहण्याचा, या हॉटेलिंगचा खर्च कोणी केला, याबाबत कुणीही प्रश्न विचारला नाही, असेही ते म्हणाले. त्यावेळी, पक्षप्रमुखांना आम्हाला तेथे राहायला सांगितलं होतं, येथे आमच्या गटनेत्यांच्या आदेशावरुन आम्ही येथे राहात आहोत, असेही केसरकर यांनी सांगितले.

28 Jun, 22 12:22 PM

महविकास आघाडीने आत्मचिंतन करावं - सुधीर मुनगंटीवार 

राज्यपालांना जेव्हा एखाद्या पक्षाकडून एखाद्या समूहाकडून एखाद्या वर्गाकडून पत्र दिले जाते. निवेदन दिले जाते.त्या संदर्भातली माहिती राज्यांनी मागवणे हे त्यांचे कर्तव्य असते. याचा अर्थ राज्यपाल यांनी आक्षेप घेतला. चूक आहे असे सांगितले असे होत नाही. भाजपच्यावतीने राज्यामधल्या अस्थिर परिस्थितीमध्ये सुद्धा काही लोक स्थिर मनाने जीआर काढत. तिथे ही या ही परिस्थितीमध्ये पैसे कमवण्याचे उद्योग करत आहेत. अशी शंका आल्याने  हे पत्र देण्यात आले आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यावर आता भाष्य करण्याची वेळ आलेली नाही. ज्या ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचं ही मन हे चंचल आणि अस्थिर होईल. महाराष्ट्राच्या जनतेच नुकसान होऊ नये. आमच्यासाठी महाराष्ट्रातील जनता नाही तर फक्त आणि फक्त खुर्ची प्रिय आहे अशी भावना केली. महविकास आघाडीने आत्मचिंतन करावे.आपल्याकडे बहुमत आहे की नाही हे त्यांनी विचारपूर्वक समजून घ्यावे, असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

28 Jun, 22 12:22 PM

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विश्वास

दोन-तीन दिवसात भाजपचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा विश्वास भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची महापूजा त्यांच्या हस्ते होईल. त्याचसोबत फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला १२ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदारांवर कुठलीही कारवाई होणार नाही, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले. 

28 Jun, 22 12:08 PM

कुर्ल्यातील इमारत दुर्घटनेची एकनाथ शिंदेंकडून दखल, मदतीची घोषणा

मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची ही 4 मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेची दखल गुवाहटीत असलेले बंडखोर नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली. एकनाथ शिंदेंकडून दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आणि जखमींच्या कुटुंबीयांस 1 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. शिंदेंच्या आदेशानुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावतीने ही मदत देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

28 Jun, 22 11:26 AM

ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही -  भरत गोगावले

शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी भरत गोगावले म्हणाले की, "आम्ही पूर्ण तयारीनिशी इथे आलो आहोत. जर 11 जुलैपर्यंत इथे राहावं लागलं तर चालेल, आम्ही तयार आहोत. ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही. नियमांनुसार जी प्रक्रिया होणं गरजेचं आहे, ती केली जात आहे. आम्ही काळजीपूर्वक पाऊल उचलत आहोत, कारण छोटीसी तरी चूर झाली तर काहीही फायदा होणार नाही. आजच्या बैठकीत राज्यपालांना पाठिंबा काढल्याबाबत पत्र द्यायचं की नाही आणि जर द्यायचं असेल तर ते कधी या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. आमच्या गटातून कोणीही बंडखोरी करणार नाही. उद्धव ठाकरे गटाला जे करायचंय ते करावं, आम्ही या लढाईसाठी पूर्णत: तयार आहोत."

28 Jun, 22 11:05 AM

'२० बंडखोर आमदार आमच्या संपर्कात', अनिल देसाईंचा दावा

बंडखोर आमदारांमधील काही आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी शिंदेंच्या गटातील २० बंडखोर आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये बंडखोर आमदारांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या डोक्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. अशा परिस्थिती त्यांनी काही चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोर्टात जाऊन त्याला मज्जाव करू. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांपैकी २० आमदार आमच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. आम्ही जेव्हा मुंबईत येऊ, तसेच जेव्हा मतदानाचा विषय निघेल तेव्हा आम्ही शिवसेनेला मतदान करू, असे या बंडखोर आमदारांनी सांगितलं आहे, असा दावा अनिल देसाई यांनी केला आहे.

28 Jun, 22 10:59 AM

'शिंदे गटातील अर्ध्याहून अधिक आमदार संपर्कात',संजय राऊतांचा दावा

आम्ही अजूनही गुवाहाटीत असलेल्या आमदारांपैकी काहींना बंडखोर मानायला तयार नाही. २० हून अधिक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज सकाळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

28 Jun, 22 10:36 AM

"मनसे हा पक्ष नसून डिपॅाझिट जप्तची मशिन", दीपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीची एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली होती. मात्र सध्याच्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमधील फोन वरील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. कारण, येत्या काही दिवसांमध्ये राज्यात नवी राजकीय समीकरणे जुळणार का, याची चर्चा आता रंगली आहे. यावरून शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

28 Jun, 22 10:24 AM

सत्तानाट्यात राज ठाकरेंची एन्ट्री?

एकनाथ शिंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात नुकतेच फोनवर बोलणे झाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे हे वेळ पडल्यास आपला गट मनसेत विलीन करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी राज ठाकरे यांनी आपल्या'शिवतीर्थ' या निवासस्थानी मनसेच्या मोजक्या नेत्यांशी चर्चाही केली होती. या बैठकीत नक्की काय ठरले, हे माहिती नाही. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता या सत्तानाट्यात राज ठाकरे यांची एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

28 Jun, 22 10:07 AM

पिक्चर अभी बाकी है!'

सध्याच्या घडामोडी पाहता या सत्तानाट्यात राज ठाकरे यांची एन्ट्री होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोमवारी रात्री एक सूचक ट्विट केले होते. यामध्ये म्हटले होते की, 'असा हा ‘धर्मवीर’… एक ‘राज’ की बात उद्या शेअर करणार आहे. पिक्चर अभी बाकी है!'. राजकीय वर्तुळात अमेय खोपकर यांच्या या वक्तव्याचे निरनिराळे अर्थ काढले जात आहेत. 

28 Jun, 22 09:06 AM

भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असून अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

28 Jun, 22 08:33 AM

संजय राऊतांनी ट्विटद्वारे शिंदे गटाला डिवचलं

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. आताही संजय राऊत यांनी ट्विट करून शिंदे गटाला डिवचलं आहे. राऊतांनी एक शायरीच्या फोटो ट्विट करून टोला लगावला आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण