Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 11:33 IST2025-11-23T11:32:23+5:302025-11-23T11:33:08+5:30
Sushma Andhare And Uday Samant : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांना खोचक टोला लगावला आहे.

Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना खोचक टोला लगावला आहे. "उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का..!!!" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"प्रिय उदयभाऊ, आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले. पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले...! त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली...!! तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक मुत्सद्दी राजकारणी आहात हे सिद्ध केले...!!! शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाताना आपण सत्तेसाठी कुणासोबतही जाऊ शकता हे सिद्ध केले...!!!!!!"
"उदयभाऊ , आता उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी उघड केल्याने एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? माझ्यामुळे आपल्या सुप्त इच्छा जगजाहीर झाल्या आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण आज वैतागून माझी आणि नरेश मस्के यांची भेट झाल्याचे मुलाखतीत सांगत होतात. होय माझी आणि नरेश मस्के यांची नक्की भेट झाली. भेट घेतली नाही; भेट झाली..!"
प्रिय उदयभाऊ,
\— SushmaTai Andhare (@andharesushama) November 22, 2025
आज एका जाहीर कार्यक्रमांमध्ये तुम्ही शिंदेंमुळे दखलपात्र झाला आहात हे मान्य केले.
....पण सगळ्यात आधी तुम्हाला राजकीय क्षेत्रात जे स्थान दिले ते ठाकरेंनी दिले...!त्यानंतर आपली एक धुरंधर राजकारणी म्हणून ओळख राष्ट्रवादीने तयार केली...!!तिथून आपण शिवसेनेत येऊन आपण एक… pic.twitter.com/ldAK9ENMja
"दिल्ली महाराष्ट्र सदन च्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खा . भाऊसाहेब वाकचौरे असताना बाजूला खा. भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना माझी भेट झाली. विशेष ही भेट झाल्यावर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली हे कदाचित आपल्याला माहित नसेल. पण तरीही मी समजूच शकते."
"उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात..! आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेला आहे. पण या निमित्ताने का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागलंय हे लक्षात आलं... असो.. हा फोटो मी काही सांगण्यापेक्षा जास्त बोलका आहे...! तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का..!!!" असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.