शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाला मुहूर्त मिळाला

By admin | Updated: December 16, 2014 03:28 IST

बईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल,

नागपूर : मुंबईच्या समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकारचे भूमिपूजन येत्या १९ फेब्रुवारीला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या या शिवस्मारकाबाबत आपल्या सरकारने या स्मारकासाठी अत्यंत आवश्यक असलेली केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी एक महिन्याच्या आत मिळविली आहे. आधीच्या सरकारने या स्मारकाचा अतिशय चांगला आराखडा तयार केलेला आहे, अशी पुस्तीही फडणवीस यांनी जोडली. सीमाभाग मिळालाच पाहिजेकर्नाटकातील सीमाभाग महाराष्ट्राचा आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला लढण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील, असे ते म्हणाले. सीमाभाग हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी बांधवांच्या अस्तित्वाचा विषय असल्याचे ते म्हणाले.अभिभाषणाबद्दल राज्यपालांचे अभिनंदन करणारा ठराव मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर मंजूर करण्यात आला. डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्याचा निर्धारमुंबईतील इंदू मिलच्या जागेवर घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी केंद्र सरकारने या स्मारकाबाबत काही मुद्द्यांवर राज्य शासनाकडून हमीपत्र मागितले होते. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांना वेळ मिळाला नसेल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला. ते म्हणाले की, १७ नोव्हेंबरला आपल्या सरकारने हे हमीपत्र पाठविले आहे. दाभोळ वीज प्रकल्प बंद होणार नाहीदाभोळ वीज प्रकल्पात बँकांचे मोठ्या प्रमाणात पैसे गुंतलेले आहेत. हा प्रकल्प बंद होणे मोठ्या आर्थिक नुकसानीस कारण ठरेल. या प्रकल्पात केंद्र सरकारने मोठा वाटा उचलावा, राज्य सरकार काही नुकसान सहन करेल. प्रकल्पातून निर्माण होणारी वीज सेंट्रल ग्रीडमध्ये जाईल. तेथून नियमानुसार राज्याला आपला हिस्सा मिळेल, अशा पद्धतीची बोलणी चालू असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)