शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्ग ठरले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 11:46 AM

पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुरचा समावेश

ठळक मुद्देई-बससाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे पुण्यापासून १७५ ते २४० किलोमीटर अंतरातील शहरांतर्गत वाहतुकीसाठी लांबपल्याच्या मार्गावरही अधिकाधिक ई-बस धावणार

पुणे : मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ या ईलेक्ट्रिक बसचे मार्गांना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुण्यासह नाशिक, औरंंगाबाद, कोल्हापुर व बोरीवलीचाही समावेश करण्यात आला आहे. या पाचही ठिकाणी सध्या ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्याच्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बॅटरीवर धावणाऱ्या ई-वाहनांना प्राधान्य दिले जात आहे. शहरांतर्गत वाहतुकीसाठी लांबपल्याच्या मार्गावरही अधिकाधिक ई-बस धावतील, याअनुषंगाने प्रयत्न केले जात आहे. देशात पहिल्यांदाच पुणे शहरात ‘पीएमपी’च्या ताफ्यात सर्वाधिक १५० ई-बस दाखल झाल्या आहेत. टप्याटप्याने ही संख्या चौपट होणार आहे. ‘एसटी’नेही पहिल्या टप्प्यात शंभर ई-बस भाडेतत्वावर घेण्याचे ठरविले आहे. त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारच्या ‘फेम इंडिया’ योजनेअंतर्गत एसटीला ५० ई-बस मिळणार आहे. यापार्श्वभुमीवर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या ई- बसचे मोठा गाजावाजा करून लोकार्पण करण्यात आले. ‘शिवाई’ असे या बसचे नामकरणही करण्यात आले. पण त्यानंतर निवडणुकांमुळे ही प्रक्रिया मंदावली होती. निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा वेग आला असून काही दिवसांपुर्वी मुंबई ते पुणेदरम्यान ई-बसची चाचणीही घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय रस्ते वाहतुक संस्थे (सीआयआरटी) कडूनही या सेवेला हिरवा कंदील आहे. एकदा बसची बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ही बस किमान ३०० किमीचा पल्ला गाठू शकते. त्यानुसार एसटीने प्राथमिक मार्ग निश्चित केले आहेत. प्रामुख्याने पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुर व बोरीवली या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे. बसची सुरूवात आणि बसचे ठिकाण, अशा दोन ठिकाणी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी चार्जिंग स्टेशन कार्यान्वित झाल्यानंतरच प्रत्यक्ष मार्गावर बस धावू शकेल. तसेच ई- बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार असून या सर्व प्रक्रियेसाठी दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ------------------ई-बससाठी निश्चित करण्यात आलेली ठिकाणे पुण्यापासून १७५ ते २४० किलोमीटर अंतरातील आहेत. त्यामुळे ई-बसच्या दृष्टीने पहिल्या टप्प्याने पुण्यालाच अधिक प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसारच ठिकाणांची निश्चिती करण्यात आल्याचे समजते. पुण्यामध्ये शंकरशेठ रस्त्यावरील एसटीच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

ई-बसचे संभाव्य मार्ग -- पुणे-नाशिक-पुणे- पुणे-औरंगाबाद-पुणे- पुणे-कोल्हापुर-पुणे- पुणे-बोरीवली-पुणे- नाशिक-बोरीवली-नाशिक-----------------------

टॅग्स :Puneपुणे