शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

‘युती’मुळे शिवसेनेचे नुकसानच होणार- भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 5:58 AM

देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे, असे भुजबळ म्हणाले

- धनंजय वाखारे देशभरात मोदीविरोधी वातावरण आहे आणि ग्रामीण भागात तर ते अधिक तीव्रतेने जाणवते आहे. मोदी सरकारच्या निर्णयांमुळे प्रत्येक क्षेत्रात पीडा आहे. या देशातील निवडणुकीचे मोठे कौतुक वाटते. कन्याकुमारीचा माणूस जो विचार करतो तोच काश्मीरचाही करतो. त्यातून अनेक लाटा आल्या गेल्या. सामान्य माणूस आपला राग मतपेटीतून व्यक्त करेल, अशी खात्री आहे.सेना-भाजपा युती झाल्यामुळे महाआघाडीला फटका बसेल काय?युती झाली नसती तर विरोधी पक्षांची मते शिवसेनेने घेतली असती. तसेही निवडून आल्यानंतर त्यांनी काय केले असते, ते देवाला माहीत. सत्तेत राहून त्यांनी जी विरोधी पक्षाची भूमिका निभावली होती, ती भाजपाविरोधी मते आता शिवसेनेला मिळणार नाहीत. लोकांनाही माहीत झाले आहे. म्हणतात ना, इंद्राय स्वाहा... तक्षकाय स्वाहा... मोदींना विरोध म्हणून शिवसेनाही स्वाहा... अशीच सारी परिस्थिती आहे.तुमच्या मते सध्या देशात काय वातावरण आहे?निवडणूक एकतर्फी होणार नाही, हे नक्की. ग्रामीण भागात मोदी विरोधी वातावरण आहे. प्रश्न शहरी भागाचा आहे. परंतु, डॉक्टर्स, बिल्डर्स, वकील असे अनेकजण त्रस्त आहेत. एकाला एक न्याय, दुसऱ्याला वेगळा न्याय. सामान्य माणूस बोलत नाही; परंतु तो मतपेटीतून व्यक्त होईल.मनसेला आघाडीत घेण्याबाबत नेमकी काय भूमिका आहे?राज ठाकरे पूर्णपणे मोदीविरोधी भूमिका घेत आहेत. मोदींनी देशाचे वाटोळे केले असल्याने मी मोदी विरोधात बोलत राहणार, असा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे. मात्र, त्यांनी आघाडीत येण्यासाठी एकही जागा मागितलेली नाही.वंचित बहुजन आघाडीच्या सभांना चांगली गर्दी होताना दिसते आहे. त्याचा काही परिणाम जाणवेल?गर्दी होते आहे; परंतु मुस्लीम समाज इकडे-तिकडे जाणार नाही. आठवलेंचा प्रभाव कमी झाल्याने दलितांचा एक गट तिकडे सरकला आहे. मोदी हटाव हेच सर्वांचे ध्येय असल्याने प्रकाश आंबेडकरांना मी नाशिकची जागाही देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु त्यांनी २२ जागा घोषित केल्या. उर्वरित जागांमध्ये मित्रपक्षांना सामावून घेऊन आमच्या हाती काय उरणार?आघाडीचे ६०% उमेदवार निश्चितआघाडीचे ६० टक्के उमेदवार निश्चित झालेले आहेत. त्यात कोल्हापूर, माढा, बारामती, शिरुर, नाशिक, दिंडोरी, मुंबईतील जागांचा समावेश आहे. आम्ही कामाला लागलो आहोत. सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड साधन सामग्री आहे. त्यामुळे केवळ मनुष्यबळाच्या आधारे काम सुरू केले आहे आणि त्यात आम्ही यशस्वी होऊ.जातीय मुद्दा चालणार नाहीजातीय मुद्दा आता चालणार नाही. कारण मराठा आरक्षण मिळाले आहे. लोकही आता सजग आणि सुजाण झाले आहेत. पवारसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायचे आहे.इव्हीएम मशीनईव्हीएम मशीनचे म्हणाल तर, अमेरिकेत बसलेल्या शुजाने सांगितलेले भयावह आहे आणि अमेरिकेने त्याला कोर्टाच्या आदेशान्वये संरक्षण दिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीतही त्याने खुलासा केला आहे. मुंडेंच्या अपघाताप्रकरणी कोणावरही कारवाई न झाल्याने महाराष्ट्रातील लोक संशय व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीMNSमनसे