"शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे अमानुष; ED, CBIला सीमेवर पाठवा!", शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 30, 2020 03:49 PM2020-11-30T15:49:49+5:302020-11-30T15:51:20+5:30

शिवसेनेने म्हटले आहे, की लडाख आणि काश्मीरातील शत्रूंशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांसोबत होत असलेल्या वागणुकीवरूनही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.

shiv sena slams modi government for using water cannons against protesting farmers and says ed and cbi should be sent to borders | "शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे अमानुष; ED, CBIला सीमेवर पाठवा!", शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

"शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे अमानुष; ED, CBIला सीमेवर पाठवा!", शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - शेतकरी आंदोलकांच्या मुद्द्यावरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. एवढेच नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणांवरूनही शिवसेनाने भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेने म्हटले आहे, की लडाख आणि काश्मीरातील शत्रूंशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांसोबत होत असलेल्या वागणुकीवरूनही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे हे 'अमानुष' असल्याचेही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून म्हटले आहे.

पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील -
शिवसेनाने आपले मुखपत्र सामना तून गुजरातमध्ये उभारण्यात आलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याचा उल्लेख करत म्हटले आहे, की "  की मूर्ति का उल्लेख करते हुए कहा कि देश के पहले गृह मंत्री सरदार पटेल ने अंग्रेजों के खिलाफ कई किसान आंदोलनों का नेतृत्व किया. लेख में कहा गया, "उनकी प्रतिमा रो रही होगी, यह देखकर कि किसानों के साथ कैसा व्यवहार किया जा रहा है."सरदार पटेल हे शेतकऱ्यांचे नेते होते. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी केलेली साराबंदी चळवळ, बार्डोलीचा सत्याग्रह निर्णायक ठरला, शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करून त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीस जेरीस आणले, पण दिल्लीच्या सीमेवर आणि देशाच्या सीमेवर सध्या जो अंदाधुंद प्रकार सुरू आहे, त्यामुळे पोलादी पुरुषाच्या पुतळ्याच्या डोळ्यांच्या कडाही ओलावल्या असतील. 

शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते -
चीनचे सैन्य हिंदुस्थानी हद्दीत लडाखमध्ये घुसले आहे. त्याचवेळी पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर अडवून ठेवण्यात आले आहे. नुसतेच अडवले नाही, तर त्यांच्यावर बळाचा, साम- दाम-दंड-भेदाचा प्रयोग केला जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचे हे आंदोलन आहे. शेतकऱ्यांना दिल्लीतील रामलीला मैदानावर जायचे आहे, पण केंद्राने लाठय़ाकाठय़ा, थंड पाण्याचे फवारे, अश्रुधुराची नळकांडी फोडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत पहाटे शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा करणे हे अमानुष आहे. तरीही शेतकरी मागे हटायला तयार नाहीत. शेतकरी इतके आक्रमक व जिद्दीला कधीच पेटले नव्हते."

सामनाच्या संपादकीयमध्ये विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप कशा प्रकारे राजकारण करत आहे, यावरही भाष्य करण्यात आले आहे. यात म्हणण्यात आले आहे, "महाराष्ट्रासह देशभरात राजकीय विरोधकांना चिरडण्यासाठी भाजप सरकार सर्व प्रकारचे हातखंडे वापरत आहे. मग ती जिद्द देशाच्या दुश्मनांशी लढताना का दिसत नाही? लडाख आणि कश्मीरातील दुश्मनांशी आपले सैन्य लढत आहेच, पण त्या जोडीने सरकारने आपल्या ईडी, सीबीआय वगैरे यंत्रणांनाही चीन, पाकिस्तान यांच्या विरोधात जुंपावे. नाहीतरी हल्ली देशातील राजकीय विरोधकांविरोधात ईडी, सीबीआय आदी तपास यंत्रणांचा हत्यार म्हणून वापर सुरूच आहे. तेव्हा या यंत्रणांना चीन आणि पाकिस्तानचीही सुपारी द्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कदाचित चीन, पाकिस्तान गुडघे टेकून शरण येतील. बहुधा लडाखमध्ये घुसलेले चिनीही शरण येतील व पाकडेही ‘पीओके’ सोडून पसार होतील. विरोधकांना नमवण्याचे तंत्र ईडी, सीबीआयला माहीत आहे असा एकंदर विद्यमान राज्यकर्त्यांचा समज दिसत आहे. त्यामुळे या संस्थांना राष्ट्रीय शौर्य गाजवण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक वेळी बंदुकांनीच काम होते असे नाही. दिल्लीच्या सीमेवर आपल्याच शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवून मारले जात आहे, तर कश्मीर सीमेवर अतिरेकी आमच्या सैनिकांचे बळी घेत आहेत. तेव्हा सीमेवरदेखील आता सैन्याबरोबर ईडी आणि सीबीआयला पाठवा! त्याशिवाय पर्याय नाही."

...ही थडगी पुन्हा उकरून काढली तर देशाला भारी पडेल -
हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी असे बेताल विधान केले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी घुसले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांचे आंदोलन देशद्रोही आहे. हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष ओमप्रकाश धनकड यांनी तर असाही दावा केला की, शेतकऱ्यांचा आंदोलनात ‘‘पाकिस्तान झिंदाबाद’’च्या घोषणा दिल्या. तशी एक क्लिपच म्हणे जारी केली. भारतीय जनता पक्षाची ही भूमिका देशातले वातावरण चिघळवणारी आहेच, पण नव्या अराजकाला आमंत्रण देणारीदेखील आहे. खलिस्तानचा विषय संपला आहे. त्या अंधारयुगातून बाहेर पडण्यासाठी इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य यांनी प्राणांचे बलिदान दिले, पण खलिस्तानचा विषय आज भाजपवाले नुसते उकरून काढत नाहीत तर त्यांना ती ठिणगी टाकून पंजाबात स्वतःचे राजकारण सुरू करायचे आहे. पंजाबातील ही थडगी पुन्हा उकरून काढली तर देशाला भारी पडेल. 

‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी -
एखादा विषय हातातून निसटला की, ‘हिंदुस्थान-पाकिस्तान’ हा खेळ सुरू करायचा ही त्यांची हातचलाखी ठरलेलीच आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही पाकिस्तान झिंदाबाद, स्वातंत्र्य, आजादीच्या नावाने घोषणा दिल्या गेल्याचे जे पुरावे समोर आणले गेले ते बोगस ठरले. आपलीच माणसे मेकअप करून घुसवायची व हे असे प्रकार घडवायचे. त्यामुळे देशाची एकात्मता, शांतता, अखंडता उद्ध्वस्त होत असते. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर नेटाने थांबला आहे व तो त्यांच्या मागण्यांसाठी जिद्दीने लढतो आहे. तो पंजाबचा आहे म्हणून त्यास देशद्रोही, खलिस्तानवादी ठरवायचे हा विचार दळभद्रीपणाचेच लक्षण आहे.

Web Title: shiv sena slams modi government for using water cannons against protesting farmers and says ed and cbi should be sent to borders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.