शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 17:23 IST

सीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी, शेलार यांची मागणी

ठळक मुद्देसीएए, एनआरसी बाबत भूमिका स्पष्ट करावी, शेलार यांची मागणी

परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याच सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका भाजप नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याला आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणार हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांच लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे. 

"NRC ला शिवसेनेचा विरोध आहे मग परराज्यातील नागरिकांची नोंदवहीचा पुरस्कार कसा करता असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी," अशी मागणी ॲड शेलार यांनी केली. गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत असं सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्यावं, असंही शेलार म्हणाले.

बालहट्टापायी मुंबईची प्राथमिकता बदललीपेंग्विनच्या टेंडरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ॲड आशिष शेलार म्हणाले, बालहट्टापायी मुंबई शहराची प्राथमिकता महापौर आणि शिवसेनेने बदलली आहे. ४३७ स्वे किमीच्या मुंबईतील २०५५ किमीवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॅार्डला २ कोटी म्हणजे १ कोटी ४० लाख मुंबईकरांसाठी फक्त ४८ कोटी खर्च करणार पण तेच एका पेग्विंनसाठी १५ कोटी खर्च करणार आहेत.  यावरुन प्रशासकीय रचना बालहट्टासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे दिसतंय. यात मुंबईकरांच्या हिताचा विचार नाही आहे. पेग्विंनमुळे आमदनी वाढली असं आयुक्तांचं वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची टीका त्यांनी केली. तसंच पेग्विंन आणा आणि तुमच्या खुर्च्या खाली करा असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाAshish Shelarआशीष शेलारMaharashtraमहाराष्ट्रChief Ministerमुख्यमंत्रीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे