शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

“शेकापची क्रेझ राहिली नाही, लक्ष्मी दर्शनानेच जयंत पाटलांना मते”; शिंदे गटातील नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 13:38 IST

Shiv Sena Shinde Group: उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी बोलून दाखवला.

Shiv Sena Shinde Group: विधान परिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सर्व जागा जिंकल्या, तर महाविकास आघाडीत प्रज्ञा सातव आणि मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे सांगितले जात आहे. यातच आता केवळ लक्ष्मी दर्शनामुळेच जयंत पाटील यांना मते मिळाली. शेतकरी कामगार पक्षाची जनतेतील क्रेझ संपली आहे, अशी टीका शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी केली आहे. 

शेकाप पक्षाचा अंत आता जवळ आला आहे. शेकापची जनमानसात असलेली  क्रेझ आता संपलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा बळी जाणार हे आधीच सांगितले होते. त्यांचा स्वभाव हाच त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणताही जनाधार नव्हता. गेल्या १५ वर्षांत जयंत पाटील यांनी कुटुंबाव्यतिरिक्त कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले. उरलेल्या शेकापचा झेडपी निवडणुकीत सुफडा साफ करणार, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला होता. परंतु, शरद पवार गटाची सर्व मते मिळाली नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. पराभवाचे आत्मचिंतन करत आहे. महाराष्ट्रात या पद्धतीचे राजकारण आधी नव्हते. थोडेफार इकडे-तिकडे व्हायचे. आधीही निवडणुका लढवल्या तेव्हा अशी स्थिती नव्हती. हे असे घडत असेल तर जनतेने दोन्ही सभागृहे कोण ताब्यात घेईल याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलShiv Senaशिवसेना