फोटो भगतसिंग यांचा, श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना; शिवसेना खासदार ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 04:21 PM2020-09-28T16:21:42+5:302020-09-28T16:23:57+5:30

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट केलं डिलीट

shiv sena mp priyanka chaturvedi pays tribute to Chandrashekhar Azad instead of shaheed bhagat singh | फोटो भगतसिंग यांचा, श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना; शिवसेना खासदार ट्रोल

फोटो भगतसिंग यांचा, श्रद्धांजली चंद्रशेखर आझाद यांना; शिवसेना खासदार ट्रोल

googlenewsNext

मुंबई: शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त केलेलं ट्विट शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींना महागात पडलं आहे. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी फोटो ट्विट केला. तो फोटो भगतसिंग यांचाच होता. मात्र त्याखाली चंद्रशेखर आझाद यांचं नाव होतं. ही चूक लक्षात येताच नेटकऱ्यांनी चतुर्वेदी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चतुर्वेदी यांनी त्यांचं ट्विट डिलीट केलं.

भाजपसोबत या, सत्तेत वाटाही घ्या; महाविकास आघाडीतल्या बड्या नेत्याला आठवलेंची ऑफर

भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी आज एक ट्विट केलं. 'दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे- चंद्रशेखर आजाद', असं फोटोखाली लिहिलं होतं. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना, ही गोष्ट नेटकऱ्यांची लक्षात आली. त्यांनी चतुर्वेदींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अखेर ट्विट डिलीट केलं.

आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद



उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. 'शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पण काही जणांना चंद्रशेअर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही. हे लज्जास्पद आहे,' अशा शब्दांत कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर निशाणा साधला.

भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

मृत्यूंजय कुमार यांच्या ट्विटला चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलं. अशा अनेक चुका पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकांउटवरदेखील झाल्या आहेत,' अशा शब्दांत चतुर्वेदींनी प्रतिहल्ला केला.

Read in English

Web Title: shiv sena mp priyanka chaturvedi pays tribute to Chandrashekhar Azad instead of shaheed bhagat singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.