make alliance with bjp central minister ramdas athawale gives offer to shiv sena | आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद

आठवलेंनी सुचवला '२-३' चा फॉर्म्युला; भाजपसोबत येण्यासाठी शिवसेनेला साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा नाराजीनाट्य घडत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपसोबत यावं, अशी साद आठवलेंनी घातली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावं, असंही आवाहन त्यांनी केलं.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार ५ वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे बंडखोरीची शक्यता आहे. तसं झाल्यास सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल, असं आठवले म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेला सोबत येण्याची साद घेतली. 'शिवसेनेनं चक्रव्यूहात अडकू नये. त्यांनी ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावं. रिपाईंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं,' अशी ऑफर आठवलेंनी दिली.

भाजपा अन् शिवसेनेची पुन्हा युती होणार?; संजय राऊतांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात..

मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. 'उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,' असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 'भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनीदेखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावं,' अशी साद त्यांनी घातली.

'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका 

शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. मग हे दोन पक्ष एकत्र कसे येणार, असं विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या आधीही दोन्ही पक्षांचे संबंध ताणले गेले होते. सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्यानं टीका सुरू होती. राज्यात सरकारमध्ये असलेली शिवसेना नाराज होती. पण अमित शहांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि युती झाली. त्यामुळे तणाव निवळू शकतो, अशी आशा आठवलेंनी व्यक्त केली.

Read in English

Web Title: make alliance with bjp central minister ramdas athawale gives offer to shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.