शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

"भगव्या ध्वजाला विरोध करणारे नतद्रष्ट कोण...? भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 6:14 PM

भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणं, हे आपलं स्वप्न आहे... आपला स्वाभिमान आहे... - संजय राऊत

मुंबई : भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्रीची शान आहे, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा आज राज्याभिषेकदिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत? असा सवाल करत, सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील, अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. याच बरोबर, भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, असेही राऊत म्हणाले.  (Shiv Sena leader Sanjay Raut commented on saffron flag on maharashtra at all government offices and gunwant sadavarte)

तुम्हाला राजकारण करण्यासाठी बाळासाहेबांची गरज लागते; संजय राऊतांना मनसेचं प्रत्युत्तर

गुणरत्न सदावर्ते यांनी, महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, असे म्हटले होते, यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत बोलत होते. राऊत म्हणले, भगवा झेंडा महाराष्ट्रावर किंवा शासकीय कार्यालयांवर फडकणे, हे आपले स्वप्न आहे, आपला स्वाभिमान आहे. स्वातंत्र्य लढ्यात भगव्याने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना लढण्याची प्रेरणा दिली. तसेच अशा पद्धतीने भगवा फडकावणे हा अजिबात तिरंग्याचा अपमान नाही. कारण भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला.

एक लक्षात घ्या, भगव्याचे तेज होते म्हणून हा देश स्वातंत्र्य लढ्यात लढू शकला. अनेक क्रांतीकार या भगव्या ध्वजाच्या तेजातून निर्माण झाले. त्यांच्या पाठीशी या भगव्या ध्वजाची आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा होती. हे जर कुणाला कळत नसेल, तर अशा लोकांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाShivrajyabhishekशिवराज्याभिषेकHinduहिंदूMaharashtraमहाराष्ट्र