शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

शिवसेनेनं कोणताही घोडेबाजार केलेला नाही- अनिल परब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 18:30 IST

शिवसेनेनं कधीही घोडेबाजार केलेला नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब यांनी केलं आहे. मनसेच्या 6 नगरसेवकांनी घरवापसी केली आहे.

मुंबई- शिवसेनेनं कधीही घोडेबाजार केलेला नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते अनिल परब यांनी केलं आहे. मनसेच्या 6 नगरसेवकांनी घरवापसी केली आहे. राजकीय पोटदुखीमुळे भाजपाकडून घोडेबाजाराचा आरोप केला जात असल्याचंही अनिल परब म्हणाले आहेत. वडापाव खाऊन शिवसैनिक निष्ठेनं काम करतो. पैसे असते तर भाजपाची सत्ता उलथवली असती, असंही विधानही अनिल परबांनी केलं आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेचं संख्याबळ वाढल्यानं भाजपाला पोटदुखी झाल्याचंही ते म्हणाले आहेत. काल (गुरुवार) भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवानंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. ‘लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू.’ असं वक्तव्य भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केले होतं. भाजपाच्या संभाव्य खेळी लक्षात घेऊन शिवसेनेनं  एक भन्नाट चाल खेळत मनसेच्या तब्बल 6 नगरसेवकांना फोडलं. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेनं तात्काळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि काल रात्रीच सर्व चर्चांना सुरुवात झाली. शिवसेनेनं ही खेळी एवढ्या शांतपणे खेळली की, मनसे आणि भाजपाला याचा थांगपत्ताही लागला नाही.

भाजपा बॅकफुटवरशिवसेनेच्या या खेळीनं भाजपा सध्या बॅकफूटवर गेलं आहे. तर मनसे अजूनही या धक्क्यातून सावरलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवकअर्चना भालेराव – वॉर्ड 126अश्विनी मतेकर- वॉर्ड 156दिलीप लांडे – वॉर्ड 163संजय तुर्डे – वॉर्ड 166हर्षल मोरे – वॉर्ड 189दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197वॉर्ड क्र. 133चे नगरसेवक परमेश्वर कदम सोडता सहाही नगरसेवक हे शिवसेनेसोबत गेले आहेत.

शिवसेनेकडून घोडेबाजार‘पोटनिवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेकडून घोडेबाजार सुरू झाला आहे. यासंबंधी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रारही केली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहत आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करू,’ अशी प्रतिक्रिया भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.

पोटनिवडणुकीमुळे शिवसेना-भाजपची चढाओढमुंबईतील प्रभाग क्र. 116 मध्ये (भांडुप पश्चिम) पोटनिवडणुकीत भाजपच्या जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ 83 तर शिवसेनेची संख्या 84 झाली आहे. मात्र शिवसेनेला 4 अपक्ष तर भाजपला 2 अपक्षांची साथ आहे.

‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान‘मुंबई महापालिकेत चिन्हानुसार आता शिवसेना 84 आणि भाजप 83 अशी स्थिती झाली आहे. मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप 84 आणि शिवसेना 83 अशी होईल आणि आमचा महापौर बसेल,’ असं वक्तव्य सोमय्यांनी केलं होतं. 

मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबलशिवसेना अपक्षांसह – 84 +  4 अपक्ष = 88भाजप अभासे आणि एक अपक्षासह – 83+अपक्ष 2= 85कॉंग्रेस – 30राष्ट्रवादी कॉंग्रेस – 9मनसे – 7सपा – 6एमआयएम – 2

टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाMNSमनसे