शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेंचा निवडणूक संन्यास!

By admin | Updated: May 28, 2014 04:19 IST

निवडणुकीत स्वकीयांनीच दगा दिला. सर्व ते प्रयत्न करूनही माझा पराभव झाला. माझे डिपॉझिट वाचले हे काय कमी नाही. यासाठी आपण कोणाला जबाबदार धरणार नाही

सोलापूर : निवडणुकीत स्वकीयांनीच दगा दिला. सर्व ते प्रयत्न करूनही माझा पराभव झाला. माझे डिपॉझिट वाचले हे काय कमी नाही. यासाठी आपण कोणाला जबाबदार धरणार नाही, मात्र निवडणुकीच्या राजकारणातून आपण निवृत्ती घेत असल्याची घोषणा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे प्रथमच सोलापुरात आले होते. सोमवारी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि निवडणुकीतील पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत आपली भूमिका विशद केली. आपल्याकडेच गृहखाते (पान १ वरुन) असल्याने पराभव होणार याची कल्पना होती. यामुळेच आपण सोलापुरात १२ दिवस तळ ठोकून होतो़ निवडणूक निकालानंतर ती शंका खरी ठरली. स्वकियांनी दगा दिला. प्रचारात छोटे-छोटे मेळावे घेतले, यात सर्वांचे सहकार्य लाभले, त्यामुळेच ३ लाख ६७ हजार मते मिळाली. माझे डिपॉजिट वाचले याचे मला समाधान आहे. फक्त वाढलेली मते मी मिळवू शकलो नाही, अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. निवडणुकीला उभे राहण्याची माझी इच्छा नव्हती, वारंवार तसे जाहीरपणे सांगितले होते. पक्षश्रेष्ठीने आदेश दिल्यानेच निवडणूक लढवावी लागली. भाजपाचे नूतन खासदार शरद बनसोडे यांनी मदत मागितल्यास आपण सहकार्य करण्यास तयार आहे. जिल्ह्णातील कोणताही प्रकल्प रखडणार नाही, त्यासाठी आपण स्वत: आग्रही राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली़ (प्रतिनिधी)