'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:25 IST2026-02-04T18:23:16+5:302026-02-04T18:25:40+5:30

Suhas Babar News: शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यावरून गिरीश महाजन संतापले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे बाबरांना समज देण्याची मागणी केली. 

'Shinde should explain, otherwise it will be the end at the beginning', Girish Mahajan got angry, warned MLA Babar | 'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा

'शिंदेंनी समज द्यावी, नाहीतर सुरुवातीलाच शेवट होईल', गिरीश महाजन संतापले, आमदार बाबर यांना इशारा

"अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे २४२ (आमदार) आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे. एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर? त्याचं उत्तर तुला मुख्यमंत्री देतील", असे म्हणत शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपा नेत्यावर टीका केली. या विधानानंतर भाजपातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. "सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचे आहे. त्यांची पहिलीच टर्म शेवटची ठरू नये", असा इशाराच कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विधानावर बोलताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "मी आताच चॅनेलवर बघितलं. सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत, ही त्यांची पहिलीच टर्म आहे. शिवसेना नेते अनिल बाबर हे माझे चांगले मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून मी सभागृहात आहे आणि ते सुद्धा अनेक वर्षे निवडून आले होते. पण, त्यांचे चिरंजीव सुहास बाबर ज्या भाषेत बोलत आहेत, ते पाहून आश्चर्य वाटलं."

"मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषेत बोलले आहेत. मला वाटते की, अजून त्यांची पहिली टर्म आहे. त्यावर ते असे म्हणत आहेत की, तेच सर्व पक्ष चालवत आहेत. सर्व पक्ष माझ्या खिशात आहेत, असे त्यांचे म्हणणे अतिशय चुकीचे आहे", अशा शब्दात गिरीश महाजनांनी संताप व्यक्त केला. 

महाजन म्हणाले, "त्यांच्या राजकारणाची सुरूवात आहे"

"ते मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत बोलत आहेत, हे अतिशय गंभीर आहे. त्यांच्या राजकारणाची अजून सुरूवात आहे. ते वर्ष-दीड वर्षापूर्वी निवडून आले आहेत. त्यांनी तोलूनमापून बोलले पाहिजे. त्यांना काय बोलावे? ते लहान आहेत. नवीन आहेत. पण मला वाटते की त्यांनी थोडे राजकारण समजून घ्यावे. अनिल बाबरदेखील आमच्याबरोबर होते. पण, त्यांचा कधीच असा तोल गेला नाही, ते मी आजपर्यंत बघितले आहे", असे गिरीश महाजन म्हणाले. 

शिंदेंनी समज द्यावी, शेवटची टर्म ठरू नये

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, "सुहास बाबर अशा पद्धतीने बोलत आहेत, मला वाटते त्यांना एकनाथ शिंदेंनी समज देण्याची गरज आहे. नाहीतर सुरूवातीलाच शेवट होईल. तुम्ही असे समजू नका की, सर्व तुमच्या खिशात आहे. भाजपाला तुम्ही काय खिशात घेता? भाजपाला तुम्ही काय चालवता? तोलूनमापून बोलले पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे. शेवटची ठरता कामा नये", असा थेट इशाराच महाजन यांनी सुहास बाबर यांना दिला. 

Web Title : महाजन ने शिंदे विधायक को चेतावनी दी: व्यवहार सुधारो, वरना राजनीतिक अंत होगा।

Web Summary : गिरीश महाजन ने शिंदे सेना के विधायक सुहास बाबर की मुख्यमंत्री पर अपमानजनक टिप्पणी की आलोचना की और चेतावनी दी कि यदि उन्होंने अपना लहजा नहीं बदला और राजनीति को बेहतर ढंग से नहीं समझा तो उनका पहला कार्यकाल ही उनका अंतिम हो सकता है। महाजन ने सीएम शिंदे को बाबर को चेतावनी देने की सलाह दी।

Web Title : Mahajan warns Shinde MLA: Correct behavior or face political end.

Web Summary : Girish Mahajan criticized Shinde Sena MLA Suhas Babar's disrespectful remarks about the Chief Minister, warning that his first term could be his last if he doesn't moderate his tone and understand politics better. Mahajan advised CM Shinde to caution Babar.