शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

महाराष्ट्रात ‘शिंदे’शाही; भाजपच्या नव्या खेळीने सारेच अवाक, राजकीय नाट्यानंतर फडणवीस बनले उपमुख्यमंत्री! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 06:17 IST

फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले.

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर लगेचच राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. मात्र, राजभवनावर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 

शिंदे यांच्या गटाला भाजप पाठिंबा देईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांच्या घोषणेनंतर भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारत नव्या सरकारात सहभागी होण्याचे आदेश दिले. या सर्व राजकीय घडामोडी प्रचंड वेगाने घडल्या. अखेरीस सायंकाळी साडेसात वाजता राजभवनावरील छोटेखानी समारंभात शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी -फडणवीस हे मोठ्या आणि उमद्या मनाचे राजकारणी आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. मंत्रिपदासाठी किंवा कोणत्याही स्वार्थासाठी आम्ही एकत्र आलो नाही, असे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मविआने पायाभूत कामांना स्थगिती दिली -अडीच वर्षात मविआने पायाभूत कामांना स्थगिती दिली. नवीन विकास योजना आणल्या नाहीत. दोन मंत्री तर भ्रष्टाचारामुळे जेलमध्ये गेले ही खेदाची बाब आहे. पण, आता आगामी काळात मेट्रो, विकासाचे प्रकल्प, ओबीसींचे राजकीय आरक्षण, मराठा आरक्षण असे अन्य सर्व विषय हे निश्चितपणे एका टप्प्यावर आणले जातील, असे राज्याचे नवे उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाChief Ministerमुख्यमंत्री