शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
4
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
5
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
6
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
7
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
8
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
9
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
10
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
11
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
12
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
13
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
14
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
15
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
16
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
17
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
18
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
19
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
20
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ हत्या आॅनर किलिंगच!

By admin | Updated: November 7, 2014 04:06 IST

माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले

पुसद (जि़ यवतमाळ)/माहूर (जि़ नांदेड) : माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले असून, नांदेड पोलिसांनी मुलीचे वडील, चुलता, चुलत भावासह दोन मध्यस्थांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ११ झाली आहे. वडील मिर्झा खालिद बेग कमर बेग (४८), काका नबाब जानी कमर बेग (५५), चुलत भाऊ विकार अहेमद नबाब जानी बेग (२८) आणि मध्यस्थ अभियंता कंत्राटदार सैयद अन्वर अली सत्तार अली (४४), कैसर मिर्झा बहद्दूर मिर्झा (४४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी सायंकाळी नांदेड पोलिसांनी अटक केली. तर यापूर्वी सुपारी घेणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुलीचे वडील, काका, चुलत भाऊ आरोपी निष्पन्न झाल्याने हा प्रकार आॅनर किलिंगचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी निलोफर खालिद बेग आणि तिचा प्रियकर शाहरूख फिरोज खान पठाण या दोघांची १० सप्टेंबर रोजी माहूर येथील रामगड किल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्ती दरवाजाजवळ या दोघांचेही प्रेत आढळले होते. आरोपींचा शोध लागत नसल्याने नांदेड पोलीस अधीक्षकांनी याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने २८ आॅक्टोबर रोजी पोलिसांनी राजू उर्फ राजा रघुनाथ गाडेकर, शेख जावेद उर्फ पेंटर शेख हुसेन, रंगराव श्यामराव बाबटकर, शेषराव उर्फ पिंटू श्यामराव बाबटकर, कृष्णा उर्फ बाबू मारोतराव शिंदे यांना अटक केली होती. तर मुख्य सूत्रधार रघुनाथ उर्फ रघू डॉन उर्फ रघू रोकडा नाना पळसकर याला २ नोव्हेंबरला अटक करण्यात आली. सर्व आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सुपारी घेऊन हत्या केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर साहित्यही काढून दिले होते. त्यावरून पोलिसांनी सुपारी देणाऱ्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, सैयद अन्वर अली आणि कैसर मिर्झा यांना संशयावरून ताब्यात घेतले. परंतु या हत्याकांडाचे गूढ उकलत नव्हते. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच या हत्याकांडाचे गूढ उकलले. बदनामीच्या भीतीतून वडील, काका व चुलत भावाने कट रचून सुपारी देऊन निलोफर आणि शाहरूखचा खून केल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या वडिलांसह पाच आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात असताना न्यायालयाने सर्वांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (वार्ताहर)