शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा पॉवरफुल धक्का, राष्ट्रवादी नेते भावूक पण अजित पवारांना होती कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 07:46 IST

आम्ही शरद पवारांशी चर्चा करून त्यांचे मन वळवतो आणि तुम्हाला हवा तसा निर्णय होईल, असा दिलासा यावेळी या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मुंबई - भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही की करपते, असे विधान काही दिवसांपूर्वी करणाऱ्या शरद पवारांनी मंगळवारी राज्याच्या राजकारणात एक मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ साली स्थापना झाल्यापासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या पवारांनी मंगळवारी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली, तसेच यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचेही पवारांनी जाहीर केले आहे. 

शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगती...’ या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्यात केलेल्या भाषणातच पवारांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. मात्र, सार्वजनिक जीवनात आपण कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पवारांच्या या धक्क्याने पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अस्वस्थ असून, पवारांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. पवारांचे भाषण संपल्यानंतर नेत्या, कार्यकर्त्यांनी पवारांना अक्षरशः घेराव घातला. जोपर्यंत पवार आपला निर्णय बदलत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका अनेकांनी घेतली. पवारांच्या समोरच जवळपास पावणेदोन तास हे नाट्य सुरू होते. यावेळी पवारांबरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा पवारही स्टेजवर उपस्थित होत्या. 

अखेर प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना विनंती केल्यानंतर शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधून बाहेर पडू शकले. आम्ही शरद पवारांशी चर्चा करून त्यांचे मन वळवतो आणि तुम्हाला हवा तसा निर्णय होईल, असा दिलासा यावेळी या नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र, पवार गेल्यानंतर युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पायऱ्यांवर उपोषणाला बसले. पवारांनी निर्णय मागे घ्यावा, अशी घोषणाबाजी हे कार्यकर्ते करत होते. दुसरीकडे शरद पवार आपल्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, रोहित पवार, अशोक पवार, शेखर निकम या सर्व नेत्यांनी निवासस्थानी जाऊन शरद पवारांची भेट घेतली.

आता पुढे काय?शक्यता १ : कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावनांचा विचार करून पवार आपला निर्णय मागे घेऊ शकतात. शक्यता २ : शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष शोधावा लागेल. त्यासाठी एक समिती गठित केलेली आहेच. ही समिती निर्णय घेईल. अध्यक्षपदासाठी चार नावे चर्चेत आहेत. शक्यता ३ : शरद पवार यांच्याकडे अध्यक्षपद कायम ठेवून पक्ष चालवण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष निवडला जाईल. पवारांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील. 

अजित पवारांना होती कल्पना?शरद पवार आपल्या राजीनाम्याची घोषणा महाराष्ट्रदिनी म्हणजे १ मे रोजीच करणार होते. मात्र, महाविकास आघाडीची त्यादिवशी सभा होती, त्यामुळे मी त्यांना विनंती केली, की आज निर्णय घेतला तर माध्यमात तेच सुरू राहील आणि सभा बाजूला राहील, असे अजित पवार यावेळी म्हणाले. त्यामुळे पवारांच्या राजीनाम्याची अजित पवार सोडून पक्षातील बड्या नेत्यांनाही कल्पना नव्हती. हे स्पष्ट झाले आहे. पवारांच्या या निर्णयाबद्दल कुटुंबात चर्चा झाली होती, त्यात अजित पवारही होते, त्यामुळेच त्यांना याची कल्पना होती, असे समजते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार