शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 13:46 IST

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते.

मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अडीच-तीन हजारांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यावर राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी हे भाजपाचे नाही तर आपले वैयक्तीक मत असल्याचा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. यावर बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करू नये असे म्हटले होते. यावर थोरातांना महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे. महसूलमंत्री पद घरात मिळाले चांगले आहे. त्यांना विचारा हे सरकार पाच वर्षे टिकेला का? राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मला वाटत असल्याचे राणे म्हणाले. तसेच चला एकत्र जाऊया आणि राज्यातील हॉस्पिटल पाहुयात, असे आव्हान राणे यांनी  थोरातांना दिले. तसेच गुजरातच्या अवस्थेवर बोलण्यास नारायण राणेंनी नकार दिला. 

संजय राऊत हे बेताल बोलतात. त्यांना काय केंद्र सरकारने सल्लागार ठेवलाय का, असा प्रश्न राणे यांनी विचारला. केंद्र सरकार सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रपती राजवटीला एवढे घाबरता कशाला असा सवाल राणे यांनी विचारला. तसेच शरद पवार यांनी यावर राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे सांगितल्यावर लक्ष वेधले असता राणे यांनी खोचक उत्तर दिले. 

महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामस्थाला विचारा राज्य सरकारची वस्तुस्थिती काय आहे ती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पटत नाही. शरद पवार बोलले आहेत पण हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. पवार जे स्थिर सरकारचे बोलले ते मला मान्य नाही. पवार सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा तर ठेवा, पण हे सरकार राहणार की जाणार ते लवकरच कळेल. ऑपरेशन लोटस सुरु नाही, पण हे सरकार आपोआपच जाणार. राऊतांकडे १८० नाहीत २०० आमदार आहेत. ते खिशातच घेऊन फिरतात, असा टोला त्यांनी लगावला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना