शरद पवारांनी एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे सार्वजनिक करावी - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 02:47 AM2020-09-16T02:47:59+5:302020-09-16T06:31:21+5:30

आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते.

Sharad Pawar should make public fake documents in Elgar case - Ambedkar | शरद पवारांनी एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे सार्वजनिक करावी - आंबेडकर

शरद पवारांनी एल्गार प्रकरणातील बनावट कागदपत्रे सार्वजनिक करावी - आंबेडकर

Next

पुणे : एल्गार परिषदेच्या प्रकरण हे बनावट असून त्याबद्दलचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी लिहले होते. ही कागदपत्रे शरद पवारांनी सार्वजनिक करावी व केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा पदार्फाश करावा, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
आंबेडकर म्हणाले की, एल्गार परिषदेचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केले होते. दरम्यान केंद्रात आरएसएस, बीजेपीचे सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केले. एल्गार परिषदेच्या निमित्ताने केंद्राने राजकारण केले असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. नको असलेले कायदे या ठिकाणी लावण्यात आले. हे सुरू असतानाच, राज्यात देवेंद्र फडणवीसांची सत्ता गेली व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे की, एल्गार प्रकरण बोगस असून, संबंधित कागदपत्रे बनावट तयार केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या विनंतीला शरद पवार हे मान देतील, अशी अपेक्षा बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली आहे.

सखोल चौकशी व्हायला हवी
एल्गार प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. असे पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. या प्रकरणातील खोटी कागदपत्रे तयार करण्यात आल्याचे पवारांना माहिती झाले आहे, तर त्यांनी ती कागदपत्रे सार्वजनिक करावी. त्यामुळे केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे याची माहिती लोकांना होईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sharad Pawar should make public fake documents in Elgar case - Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.