शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:58 IST

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा 

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता संपादन रॅली’चे आयोजन राज्यभरजे वंचितच्या जीवावर निवडून आले तेच ताटात विष कालवत आहेत - आण्णाराव पाटील वंचितमधून २५ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात येणार - आण्णाराव पाटील

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे ३७० जातींचे प्रतिनिधीत्व करतात. यामुळेच त्यांनी लोकसभेमध्ये अनेक जातींच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले़ याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी ही सुरू केली असून, वंचितमधून २५ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे़ एमआयएम पक्षाने स्वत:हून वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ जे वंचितच्या जीवावर निवडून आले तेच ताटात विष कालवत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आण्णाराव पाटील यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता संपादन रॅली’चे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे़ ही रॅली सोलापुरात आल़ी. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अ‍ॅड. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जावेद पटेल, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, अमृता अलदार, नगरसेविका ज्योती बमगोंडे, शंकरराव लिंगे, सचिन माळी, बाळासाहेब बंडगर, उमर शेख, विठ्ठल पाथरुट मंचावर होते़.

पाटील म्हणाले, हे सरकार ईव्हीएम मशिनच्या बळावर निवडून आले आहे़ आम्हाला उशीर लागला तरी प्रामाणिकपणे सत्तेवर येऊ़ साधी कविता करणारा जर आज केंद्रीय मंत्री होऊ शकतात तर बाबासाहेबांचे वंशज अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर का मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत़? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  वंचित बहुजन आघाडीला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून २८८ जागांसाठी साडेसहा हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी यशपाल भिंगे, नगरसेवक चंदनशिवे, सचिन माळी, शंकर लिंगे, अमृता अलदार यांची भाषणे झाली.  सूत्रसंचालन अंजना गायकवाड यांनी केले.

सहावेळा वीज गेलीसकाळी ११ वाजल्यापासूनच हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शीतल साठे, सचिन माळी यांचा जलसाचा कार्यक्रम सुरू होता़ या जलसालाही उत्तम प्रतिसाद उपस्थितांनी दिला़ या कार्यक्रमानंतर दुपारी अनेक नेत्यांचे मनोगत सुरू झाले़ या दरम्यान हुतात्मा सभागृहात ६ वेळा लाईट गेली़ यावेळी उपस्थितांनी मोबाईलचे टॉर्च सुरू करत घोषणाबाजी केली़ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सत्ता संपादन रॅली ही सोलापुरात दाखल झाली़ या रॅलीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी केली होती़ 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019