'शरद पवार ते सक्षणा सलगर' हा आहे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा तोफखाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 17:40 IST2019-03-25T17:36:52+5:302019-03-25T17:40:29+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यापर्यंत सर्व भागातील नेत्यांचा समावेश आहे. 

'Sharad Pawar to Sakshana Salgar' here is list of NCP star campaigners | 'शरद पवार ते सक्षणा सलगर' हा आहे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा तोफखाना 

'शरद पवार ते सक्षणा सलगर' हा आहे राष्ट्रवादीच्या प्रचाराचा तोफखाना 

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या तोफखान्यासह तयार झाला असून स्टार प्रचारकांच्या याद्या प्रसारित होण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली असून त्यात अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांच्यापर्यंत सर्व भागातील नेत्यांचा समावेश आहे. 

सध्या भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे. २०१४साली सरकार बदलण्यात सोशल मीडियाने बजावलेली भूमिका लक्षात घेता राष्ट्रवादीचे नेते खूप आधीपासून ट्विटर आणि फेसबुकवर ऍक्टिव्ह आहेत. यातील अनेकजण येणाऱ्या कमेंट्सनाही उत्तरं देत असतात. हा सर्व विचार करून राज्यातील सर्व भागांचे आणि जातीधर्माचे प्रतिनिधीत्व करू शकतील असे स्टार प्रचारक राष्ट्रवादीने निवडले आहेत. यात पक्षात नव्याने आलेल्या डॉ अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. 

हे आहेत स्टार प्रचारक : सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप सोपल, धीरज शर्मा, सक्षणा सलगर, अमोल कोल्हे, मधुकर पिचड, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, वर्षा पटेल, सुषमा अंधारे, चित्रा वाघ, जयदेव गायकवाड, गफ्फर मलिक 

Web Title: 'Sharad Pawar to Sakshana Salgar' here is list of NCP star campaigners