शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:20 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे.

औरंगाबाद -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी मन(से) बात झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा 40 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे.

लोकसभा निवडणुकांना काही महिनेच उरले असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या मनसेचा चांगलाचा प्रभाव जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी अन् शिवसेनेवर होणारी टीका आणि शरद पवारांसोबत वाढणारी जवळीक लक्षात घेता मनसेही आघाडीत जाण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, याबाबत काँग्रेसने अद्यापही मौन पाळले आहे. मात्र, मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल. या जागांवरील आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यात मनसेची भूमिका महत्त्वाची ठरेल. 

दरम्यान, मुंबईतील काही मतदारसंघात मनसेचं स्थान भक्कम आहे. तसेच ठाणे, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातील काही मतदारसंघात मनसे जोमाने उतरणार आहे. तर, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेऊनच भाजपाचा विजयीरथ रोखण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण