सीवर्ल्ड प्रकल्प रद्द होणार, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

By admin | Published: July 16, 2017 09:00 PM2017-07-16T21:00:55+5:302017-07-16T21:00:55+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालणा देणारा तसेच येथील प्रगतीत भर घालणाऱ्या महात्वाकांक्षी सिवर्ल्ड प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या आमदारानी मालवण येथील आमसभेत

Sewerd project can be canceled, Narayan Rane's robbery | सीवर्ल्ड प्रकल्प रद्द होणार, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

सीवर्ल्ड प्रकल्प रद्द होणार, नारायण राणे यांचा गौप्यस्फोट

Next

 ऑनलाइन लोकमत
 कणकवली, दि. 16 - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालणा देणारा तसेच येथील प्रगतीत भर घालणाऱ्या महात्वाकांक्षी सिवर्ल्ड प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या आमदारानी मालवण येथील आमसभेत आपले अज्ञान प्रकट केले आहे. पालकमंत्री तसेच या आमदारांची हा प्रकल्प उभारण्याची क्षमता नसल्याने तो रद्द होण्याच्या स्थितित असून त्यामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होणार असल्याचा गौप्यस्पोट काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केला.
  येथील ओम गणेश निवासस्थानी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते.
 नारायण राणे म्हणाले, मालवण येथील आमसभेत आमदार वैभव नाईक यांनी सिवर्ल्ड बाबत आपले अज्ञान प्रकट केले आहे. सि वर्ल्ड हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तसेच राज्याच्या प्रगती साठी महत्वाचा प्रकल्प आहे. जिल्ह्यात पर्यटकाना आकर्षित करु शकेल असा हा प्रकल्प आहे. मी पालकमंत्री असताना हा प्रकल्प जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांकडून या प्रकल्पाला मागणी होती. तरीही अनेक मंत्र्यांच्या विरोधाला तोंड देवून तो पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात यावा यासाठी मंजूर करून घेतला आहे.
 हा प्रकल्प राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्र शासनाचा पर्यटन विभाग तसेच खाजगी गुंतवणूकदारांच्या सहकार्याने उभारण्यात यावा असे सांगून त्यावेळी परवानगी दिली होती. तसेच या प्रकल्पासाठी 100 कोटि रूपये जिल्ह्याच्या तिजोरित जमा केले होते. 1200 कोटींचा असलेला हा प्रकल्प आता 2000 कोटिपर्यन्त गेला असेल. मात्र कधीही हा प्रकल्प 5000 कोटींचा नव्हता.
  राज्य शासनाने या प्रकल्पासाठी पहीले निधी खर्च करावा तसेच केंद्र शासनाने त्याला मदत करावी व निधी कमी पडल्यास खासगी गुंतवणूकदाराची मदत घ्यावी असे ठरले होते. त्यामुळे प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांवर अवलंबून रहाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
 शासनाने अजूनही प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली नाही. तसेच प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येणार ? त्याचा प्रारूप आराखडा कसा असणार हे प्रसिध्द केलेले नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी अटी,शर्ती याबाबत माहिती दिलेली नाही.त्याची जाहिरातही प्रसिध्द केलेली नाही. तर गुंतवणुकदार प्रकल्पात कसे गुंतवणूक करणार? एवढेहि या आमदाराना समजत नाही. प्रकल्पाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमदारानी निदान याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून तरी आमसभेत बोलणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. सध्याची या प्रकल्पाची स्थिति पाहिली तर तो रद्द झाला असे समजायला हरकत नाही.
  एवढ्या मोठ्या प्रकल्पाची माहिती देताना आमदाराने शासनाकडून तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेवुनच ती जनतेला देणे अपेक्षित आहे. तिन वर्षे आमदार होवून होत आली तरी या आमदाराना याचे ज्ञान नाही हे दुर्दैव आहे.
 यापूर्वी पालकमंत्र्यानीहि विमानतळाबाबत चुकीची माहिती देवून जनतेची दिशाभूल केली होती. विमानतळासाठी आपण निधी आणला अशी प्रसिध्दि त्यांनी केली होती. मात्र, चीपी येथील विमानतळ खासगिकरणातून उभारला जात आहे. खासगी कंपनीने त्यासाठी आतापर्यन्त खर्च केला आहे. नवीन पालकमंत्र्यांच्या राजवटित त्याचे क्षेत्र पूर्वी पेक्षा कमी झाले आहे. हे सत्य आहे.
  या विमानतळावर जुलै मध्ये उड्डाणाची चाचणी होणार असल्याचे त्यांनी जाहिर केले होते. परन्तु आता ती चाचणी नोव्हेंबर मध्ये केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचेही भवितव्य अंधारात आहे. असेही राणे यावेळी म्हणाले.
 शिवसेनेचे आमदार कार्यशून्य !
 राष्ट्रीय महामार्ग 66 वर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात होत असून लोकांचे बळीही जात आहेत. खड्डे बुजवुन घेण्यास पालकमंत्री तसेच आमदार नाईक कमी पडले आहेत.त्यामुळे त्या दोघांना आमदार म्हणून रहाण्याचा नैतिक अधिकार नाही. अपघातात माणसे जखमी होण्याला हे दोघे शिवसेनेचे आमदार जबाबदार असून ते कार्यशून्य आहेत.अशी टिका नारायण राणे यांनी यावेळी केली.

Web Title: Sewerd project can be canceled, Narayan Rane's robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.