शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सात युद्धनौका, सहा पाणबुड्यांनी नौदल होणार सुसज्ज

By admin | Updated: July 28, 2014 04:06 IST

नौदलाला येत्या काळात आणखी सुसज्ज करण्यासाठी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांचा हातभार लागणार आहे.

मुंबई : नौदलाला येत्या काळात आणखी सुसज्ज करण्यासाठी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांचा हातभार लागणार आहे. या युद्धनौका आणि पाणबुड्यांवर माझगाव डॉकमध्ये काम सुरू असून, ब्राव्हो प्रकारातील चार युद्धनौका तयार केल्या जात आहेत. यातील एक युद्धनौका दोन वर्षांत येणार आहे तर सहा पाणबुड्या २०१६पर्यंत नौदलाच्या ताफ्यात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. नौदलाच्या ताफ्यात सध्या २०३ विविध प्रकारच्या युद्धनौका आणि पाणबुड्या आहेत. यामध्ये पारंपरिक युद्धनौका, पाणबुड्या, आण्विक, भूजलचर, विमानवाहू जहाज, युद्धनौकांना पेट्रोल पोहोचवणारी इत्यादींचा समावेश आहे. नौदल अशा विविध युद्धनौका आणि पाणबुड्यांनी सज्ज झालेले असतानाच येत्या काळात आणखी सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांनी अधिक सुसज्ज होणार आहे. माझगाव डॉकमध्ये सात युद्धनौका आणि सहा पाणबुड्यांची बांधणी केली जात आहेत. ब्राव्हो प्रकारातील चार युद्धनौकांची बांधणी केली जाणार असून, यातील एक युद्धनौका दोन वर्षांत नौदलाच्या ताफ्यात येईल, असे नौदलातील सूत्रांनी सांगितले. ब्राव्हो प्रकारातील युद्धनौका पहिल्यांदाच बनविल्या जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्कॉर्पेन’ प्रकारातील सहा पाणबुड्याही बनविल्या जाणार असून, या २०१६पर्यंत नौदलाला सुपुर्द करण्याचा प्रयत्न असणार आहे. (प्रतिनिधी)