सात प्रकल्प ओव्हरफ्लो

By Admin | Updated: September 9, 2014 04:46 IST2014-09-09T04:46:31+5:302014-09-09T04:46:31+5:30

पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाची पातळी वाढली असून सात प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.

Seven Projects Overflow | सात प्रकल्प ओव्हरफ्लो

सात प्रकल्प ओव्हरफ्लो

वर्धा : पावसामुळे मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पाची पातळी वाढली असून सात प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. 
जिल्ह्यातील लघु प्रकल्प असलेली कवाडी, सावंगी, लहादेवी, अंबाझरी, पांजरा, बोथली, उमरी जलाशये पूर्णत: भरली आहेत. तसेच आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुर्‍हा, रोठा-१ आणि रोठा-२, आष्टी, कन्नमवारग्राम, परसोडी, मलकापूर, हरासी ही जलाशयेही पूर्णत: भरलेली असून त्यांच्या सांडव्यावरून प्रवाह सुरु आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात ५९३.२0 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. देवळी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, या तालुक्यात १६५ मि.मी. पाऊस झाला. त्यापाठोपाठ वर्धा तालुक्यातही अतवृष्टी झाली असून, ९६.६0 मि.मी. पाऊस या तालुक्यात झाला. यासह देवळी तालुक्यात काही घरांची पडझड झाली. यशोदा नदीला आलेल्या पुरामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. यामुळे बसफेरी रद्द करण्यात आली. कारंजा तालुक्यातील नागाझरी येथे घरांची भिंत पडल्याने त्याखाली दबून एकाच कुटुंबातील तिघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Seven Projects Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.