शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सातही दिवस दुकाने खुली!

By admin | Updated: March 22, 2015 02:39 IST

महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती.

नोकरांना साप्ताहिक सुटी बंधनकारक : महिला कर्मचाऱ्यांना रात्री ९.३० पर्यंत काम !मुंबई : महाराष्ट्रातील व्यापारी, व्यावसायिकांना आता वर्षातील ३६५ दिवसही आपली दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. या दुकानांना आतापर्यंत आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक होती. मात्र आता राज्य शासनाने हे बंधन उठविले आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्री ८ नंतर कामावर ठेऊ नये, असे आदेश होते. आता त्यात दीड तासाची सवलत देत ही वेळ रात्री ९.३० अशी करण्यात आली आहे.व्यापारी, व्यावसायिक कर्मचाऱ्यांना सुटी देत नाहीत, म्हणून आठवड्यातून एक दिवस दुकान बंद ठेवण्याची सक्ती शासनाने केली होती. परिणामत: ठोक व चिल्लर विक्रेते आठवड्यातून एक दिवस आपले दुकान बंद ठेवत होते. त्या त्या शहरातील व बाजार ओळीतील परंपरेनुसार कुठे रविवार, कुठे मंगळवार तर कुठे बुधवारी दुकाने बंद राहत होती. या व्यापाऱ्यांना होळी-दिवाळीसारख्या सणांना दुकान उघडे ठेवायचे असेल तर कामगार विभागाकडून विशेष परवानगी घ्यावी लागत होती. विनापरवानगी दुकान उघडे दिसल्यास कारवाईला सामोरे जावे लागत होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अधिक होती. नव्या अधिसूचनेमुळे या जाचातून आता व्यापाऱ्यांची सुटका झाली आहे. आता दुकान वर्षाचे संपूर्ण ३६५ दिवस खुले ठेवता येणार असले तरी कर्मचाऱ्यांना मात्र आठवड्यातून एक दिवस सुटी बंधनकारक आहे. त्यात केवळ त्यांना रोटेशनने सुटी देण्याची सवलत देण्यात आली आहे.च्एका दिवशी ९ तासांपेक्षा अधिक व आठवड्यात ४८ तासांपेक्षा अधिक काम कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाणार नाही याची खबरदारी व्यापारी-व्यावसायिकांना घ्यावी लागेल.च्मध्य प्रदेश, दिल्लीत सर्व दिवस व्यापार सुरू ठेवण्याची सवलत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील रिटेल व्यापारी महासंघाने हा पॅटर्न लागू करण्याची मागणी केली. शासनाने ती मान्य केली.च्वर्षभरासाठी ही सवलत लागू असून, त्यानंतर फेरआढावा घेऊन ही सवलत कायम ठेवायची की बंद करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे.३५ लाख दुकानदारांना याचा फ ायदा होईल. आठवडाभर मॉल, बडी दुकाने सुरू राहायची. मात्र एक दिवसाच्या सुटीची अट होती. ती काढल्याने व्यवसाय नक्कीच वाढेल. नोकरांना एक दिवस सुटी देण्याची अट नक्कीच पाळू.- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनआतापर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठान आठवड्यातून एक दिवस बंद राहत असल्याने कामगारांना हक्काची सुटी मिळायची. आता ती प्रतिष्ठानच्या मालकांच्या मर्जीवर अवलंबून राहील, असा धोका नवीन आदेशात आहे. सुटीची अंमलबजावणी होते की नाही, यावर कामगार विभागाने लक्ष ठेवले पाहिजे. - एम. ए.पाटीलअध्यक्ष, सर्व श्रमिक संघ.