‘सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार’, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 08:08 IST2026-02-12T08:08:00+5:302026-02-12T08:08:50+5:30

Akash Fundkar News: सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.

‘Separate rules will be prepared for cine artists’, announces Labor Minister Akash Fundkar | ‘सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार’, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा

‘सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार’, कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची घोषणा

मुंबई - सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून, नियमावलीचा मसूदा तयार झाल्यानंतर कला क्षेत्रातील अभ्यासू व संबंधित घटकांकडून सूचना मागविण्यात येतील. प्राप्त सूचनांचा सकारात्मक विचार करून अंतिम नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली.

कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कामगार संहिता (लेबर कोड) च्या अनुषंगाने सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुन्मोड, उपसचिव रोशनी पाटील, प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पुनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सिने क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, वेतन, विमा, कामाचे तास, कल्याणकारी योजना तसेच कामगार संहितेतील तरतुदींची अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सिने कलाकारांच्या हितासाठी स्वतंत्र नियमावली तयार करून त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले की, नवीन कामगार संहितेच्या चौकटीत सिने क्षेत्रातील कलाकार व संबंधित कामगारांच्या हितासाठी स्पष्ट व प्रभावी नियमावली तयार करण्यात येईल. त्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

यावेळी Cintaa (सिंटा) सिने एंड टेलीविज़न आर्टिस्ट एसोसिएशन वतीने अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे आणि पुनम ढिल्लो यांनी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, सहाय्यक व विविध विभागांतील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्या. बैठकीदरम्यान नियमावली संदर्भात सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Web Title : फिल्म कलाकारों के लिए जल्द ही अलग नियम: मंत्री आकाश फणडकर

Web Summary : महाराष्ट्र फिल्म कलाकारों के लिए नए श्रम संहिताओं के तहत नियम बनाएगा। मंत्री आकाश फणडकर ने पद्मिनी कोल्हापुरे और पूनम ढिल्लों सहित उद्योग प्रतिनिधियों के साथ बैठक के बाद यह घोषणा की, जिसमें कलाकारों और तकनीशियनों के लिए सामाजिक सुरक्षा, वेतन और कल्याणकारी योजनाओं पर ध्यान केंद्रित किया गया।

Web Title : Separate Regulations for Film Artists Soon: Minister Akash Fundkar

Web Summary : Maharashtra to formulate regulations for film artists under new labor codes. Minister Akash Fundkar announced this after a meeting with industry representatives, including Padmini Kolhapure and Poonam Dhillon, focusing on social security, wages, and welfare schemes for artists and technicians.