पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा

By Admin | Updated: September 2, 2015 02:12 IST2015-09-02T02:12:47+5:302015-09-02T02:12:47+5:30

कौटुंबिक वादातून पत्नीने बादलीने केली होती मारहाण

Sentenced to imprisonment for spouse beaten by husband | पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा

पतीला मारहाण करणा-या पत्नीस कारावासाची शिक्षा

अकोला : कौटुंबिक कलहातून पतीला बादलीने मारहाण करणार्‍या एका महिलेस न्यायालयाने मंगळवारी तीन महिने कारवासाची शिक्षा सुनावली. जुने शहरातील रहिवासी नीता महेशकुमार शर्मा नामक महिलेने ३0 जुलै २00८ रोजी तिचे पती महेशकुमार हिरालाल शर्मा यांना बादली मारून जखमी केले होते. याप्रकरणी महेश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी नीताविरूद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल केला होता. जुने शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून, न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गजला-अल-अमुदी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने नीताला दोषी ठरवून, तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने ५00 रुपये दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी १५ दिवस कारावासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली.

Web Title: Sentenced to imprisonment for spouse beaten by husband