काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 12:43 IST2024-09-27T12:42:34+5:302024-09-27T12:43:09+5:30

Rohidas Patil News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते.

Senior Congress leader, former minister Rohidas Patil passed away | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. मागच्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. दरम्यान, आज सकाळी ११ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवसस्थानापासून निघेल आणि देवपुरात  एस एस व्ही पी एस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  

Read in English

Web Title: Senior Congress leader, former minister Rohidas Patil passed away