शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

रीओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पांगरेच्या सुयशची निवड

By admin | Updated: September 5, 2016 17:01 IST

तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची ब्राझील येथील रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जलतरण प्रकारात निवड झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 
करमाळा, दि. ५ - तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची ब्राझील येथील रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जलतरण प्रकारात निवड झाली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत जलतरणात निवड झालेला सुयश हा पहिला भारतीय खेळाडू असून त्याच्या या यशाबद्दल तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
 
लहाणपणी वीज धक्क्याच्या एका अपघातानंतर दोन्ही हात कोपराजवळून कापावे लागल्यानंतर अपंग बनलेल्या सुयशने वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणामध्ये उल्लेखनीय कौशल्य प्राप्त केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतून सातत्याने पदाकांची लयलुट करणारा सुयश आता  पॅरालिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
 
७ ते १८ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारत देशाचे १९ सदस्यांचे पथक रवाना झाले असून या पथकात समाविष्ट असलेला सुयश ५० मीटर बटरफ्लाय,५० मीटर फ्रि स्टाईल,२०० मीटर अशा तीन प्रकारात सुयश देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी,१२ सप्टेंबरला सायंकाळी आठ वाजता,१३ सप्टेंबरला सहा वाजून तेहातीस मिनिटांनी सुयश सहभागी असलेल्या स्पर्धा होणार आहेत.
 
सदर स्पर्धेत सुयश देशासाठी पदक नक्की जिंकेल.असा विश्वास त्याचे वडील नारायण जाधव यांनी व्यक्त केला आहे.तर,करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अपंग खेळाडूने मारलेली झेप अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया अपंगांचे नेते आ.बच्चू कडू यांनी दिली आहे. सुयशच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर अपंगांचे नेते आ.बच्चू कडू,आ.नारायण पाटील,भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने,अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी,अमित जागते यांनी अभिनंदन केले आहे.