दुसरी पर्वणी सुसह्य होईल!

By Admin | Updated: September 3, 2015 01:38 IST2015-09-03T01:38:16+5:302015-09-03T01:38:16+5:30

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली असली तरी दुसरे शाही स्नान सुसह्य होण्यासाठी प्रशासनाने फेरनियोजनाची तयारी केली आहे.

The second one will be comfortable! | दुसरी पर्वणी सुसह्य होईल!

दुसरी पर्वणी सुसह्य होईल!

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली असली तरी दुसरे शाही स्नान सुसह्य होण्यासाठी प्रशासनाने फेरनियोजनाची तयारी केली आहे. दुसऱ्या पर्वणीला देशभरातील भाविकांसह नाशिककरांनाही स्नान करता यावे, यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांनी दिली.
पहिल्या पर्वणीचे नियोजन का व कसे फसले? भाविक का आले नाहीत, यावर चर्चा करण्यापेक्षा दुसऱ्या पर्वणीच्या नियोजनाची तयारी केली जात आहे. पहिल्या पर्वणीच्या नियोजनातील त्रुटी दूर करुन उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेवरला जाणाऱ्या भाविकांसाठी नाशिकमधून फक्त मेळा बस स्थानकावरच व्यवस्था होती. आता त्र्यंबक मेळा स्टॅण्ड, सातपूर, ठक्कर बजार, डोंगरे मैदान आदी ठिकाणांहून भाविकांसाठी सोय करण्यात येणार आहे, असे कुशवाह यांनी सांगितले.
शहरांतर्गत रस्ता वाहतूक सुरळीत ठेवण्याबाबतही प्रयत्न राहणार आहे.

आंध्र प्रदेशात पुष्कर मेळा भरणाऱ्या राजमुंद्री येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सोहळ्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या शिफारशी करण्यात आलेल्या आहेत.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीला भाविक कमी येण्याची शक्यता आदल्या दिवशीच दिसत होती. मात्र बॅरिकेडिंग काढल्याने बंदोबस्त शिथिल झाल्याचा संदेश जाणे योग्य नव्हते, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

(प्रतिनिधी)

Web Title: The second one will be comfortable!