शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

वैज्ञानिक कथा, कादंबरी हेही साहित्यच, डाॅ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात केला विज्ञान लिखाणाचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:10 IST

वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन.

- धनंजय रिसोडकर कुसुमाग्रजनगरी, नाशिक : वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. वैज्ञानिक कल्पनेभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी विज्ञान साहित्य म्हणून मानल्यास आक्षेप असू नये, असे प्रतिपादन ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रख्यात शास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी केले.विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत  सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात मिळाली. त्यामुळे मराठीचे अपूर्णत्व जास्त कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत, अशी खंतही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशकात सांयकाळी संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील, पसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कुठल्याही भाषेतील साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असाे, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही’ इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.

विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यांना करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिट्यूशन ते काम बजावीत आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

 गडकिल्ल्यांच्या स्मृती जपा : विश्वास पाटील शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रुपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे कर्तव्य आहे, असे मत संमेलनाचे उद‌्घाटक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

सत्य लिहिणारे ठरतात राष्ट्रविरोधी : जावेद अख्तरसक्षम लोकशाहीसाठी संसद, शासन, विरोधक  याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. त्यामुळे साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायला हवे असे प्रतिपादन जावेद अख्तर यांनी केले. ते म्हणाले, एखादा लेखक काल्पनिक लिहितो, तोपर्यंत तो चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहितो तेव्हा त्याला पूर्वी वाईट ठरवले जाई, आता त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे नको असतात.  साहित्यिकानी पक्षनिष्ठा पाळत न बसता देशहितासाठी लिहिले पाहिजे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनJayant Narlikarजयंत नारळीकर