शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

बाबासाहेबांच्या नावाने होणार सायन्स आणि आयटी पार्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 6:19 PM

एका तरुण अभ्यासकाने पुढाकार; शरद पवारांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार

ठळक मुद्देदेशातील पहिला प्रकल्प : सामाजिक न्याय, माहिती तंत्रज्ञान विभागाकडे प्रस्तावपहिल्या पाच वर्षांसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणारदरवर्षी हजारो रोजगार उपलब्ध होणार असून, प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ

धनाजी कांबळे -पुणे : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन १४ एप्रिल जगभर ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांचा शिक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने देशातील पहिला सायन्स आणि आयटी पार्क पुण्यात उभारण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी एका तरुण अभ्यासकाने पुढाकार घेतला असून, याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होण्यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. संशोधन, आयटी, माध्यम क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षांपासून असलेल्या सुजित ठमके यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. सामाजिक न्याय मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पहिल्या पाच वर्षांसाठी १५०० कोटी रुपयांचा निधी यासाठी लागणार असून, त्यानंतर दरवर्षी शंभर कोटींची तरतूद करावी लागणार आहे. या पार्कच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोजगार उपलब्ध होणार असून, प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देखील या पार्कमधून तयार होईल. आयटी बेस प्रशिक्षण, संशोधन यासबंधीचे मार्गदर्शन केले जाईल, असा नाविण्यपूर्ण प्रकल्प सरकारकडे मांडण्यात आला आहे. सुपर कॉम्प्यूटर, एचपीसी सेंटर, स्पेस टेक्नोलॉजी तसेच शासकीय, खासगी आणि व्यावसायिक विभागांचा देखील यात समावेश असणार आहे. नव्याने विकसित होणारे तंत्रज्ञान आणि त्याचा सर्वसामान्य शेतकरी माणसाच्या जीवनात त्याचा कसा उपयोग करता येईल, याचेही मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे. या पार्कसाठी लागणारी जमीन आणि इतर सामग्री याबाबतही अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी प्रस्तावात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नेते शरद पवार यांना या प्रकल्पाबाबत माहिती दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील दिशा आणि अपेक्षित कालावधी याची केंद्रीय स्तरावर प्रकल्प यशस्वी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही वेळ घेण्यात आल्याचे ठमके यांनी सांगितले.  पार्कचे स्ट्रक्चर उभे राहिल्यानंतर आयआयटी, इस्रो, आयएमडी, भाभा अणुकेंद्र, टाटा संशोधन केंद्र यांचे तांत्रिक साह्य घेण्यात येणार आहे. तसेच सायन्स आणि टेक्नोलॉजी तज्ज्ञ, संशोधक यांचीही मदत घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सायन्स आणि आयटी पार्क असावे. ज्यातून रोजगार निर्मिती होईल आणि वाढत्या बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी कल्पना गेल्या चार-पाच वर्षांपासून मनात होती. त्यासंबंधाने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा सुरु होती. त्यातून या प्रकल्पाचा एक आराखडा तयार केला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यासोबत चर्चा करून पुढील दिशा ठरणार आहे. त्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या वैभवात निश्चितपणे भर पडेल.- सुजित ठमके, प्रकल्प निर्माते

टॅग्स :PuneपुणेDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरscienceविज्ञानITमाहिती तंत्रज्ञान