शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

भूतबाधा टाळण्यासाठी शाळेला ‘लिंबू-मिरची’!

By admin | Updated: December 25, 2014 03:10 IST

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यात शाळेने

रवि रामगुंडेवार,एटापल्ली (जि़ गडचिरोली) विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शाळांमधून विज्ञानाधारित शिक्षण देणे अपेक्षित असताना गडचिरोली जिल्ह्यात शाळेने अंधश्रद्धेचा धडा गिरवला. विद्यार्थ्यांना भूतबाधा होऊ नये म्हणून शाळेला भारलेली लिंबू-मिरची बांधण्यात आली! एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही विनोबा भावे आश्रमशाळेत हा प्रकार घडला़ दुर्गम भागातील पंदेवाही आश्रमशाळेची सहावीची विद्यार्थिनी सुनीता कुल्ले ओकसा हिचा १ डिसेंबर रोजी मलेरियाने मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना विविध आजारांनी ग्रासले. या आजारी विद्यार्थ्यांवर औषधोपचार करण्याऐवजी शाळेच्या शिक्षकांनी वेगळीच ‘मात्रा’ लागू केली. विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे इतर विद्यार्थ्यांना भूतबाधा झाल्याचा संशय व्यक्त करीत गावातील काही ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांसह शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत आश्रमशाळेत पूजाविधी केला. भारलेले लिंबू-मिरची संपूर्ण वर्गखोल्या व निवासी खोल्यांना बांधण्यात आले! आश्रमशाळेत घडलेल्या अंधश्रद्धेच्या या प्रात्यक्षिकाबाबत मुख्याध्यापकाकडे विचारणा केली असता, ग्रामस्थांच्या दबावापोटी पूजापाठ केल्याचे त्यांनी कबूल केले. तर या घटनेची माहिती मिळताच भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे निरीक्षक डॉ. ललित कायरकर यांनी शाळेला भेट देऊन गावकऱ्यांचे जबाब नोंदवले. परंपरेनुसार आपण शाळेत लिंबू- मिरच्या बांधल्या, असे पालकांनी जबाबात नमूद केले.