शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती वाटप प्रक्रिया ठप्प

By admin | Updated: March 10, 2015 04:29 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेच्या कामकाजावर सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी

अकोला : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेच्या कामकाजावर सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेने बहिष्कार टाकल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे़ साहाय्यक आयुक्तांविरुद्धच्या कारवाईच्या निषेधार्थ पाऊल उचलल्याचे सांगितले.राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील राज्यात सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. मागासवर्गातील विद्यार्थ्यांना समाजातील मुख्य प्रवाहात येता यावे, यासाठी केंद्र सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृती ही महत्त्वाकांक्षी योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविली जाते. मात्र, १ नोव्हेंबर २००३पासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेत अनेक ठिकाणी गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे़ यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यात साहाय्यक आयुक्त तुकाराम बरगेंविरुद्ध करण्यात आलेली कारवाई आणि अटक, यामुळे राज्यातील सामाजिक न्याय विभागाने शिष्यवृत्ती वाटपाचे काम बंद केले आहे. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव शाळा-महाविद्यालयांकडून मिळाल्यानंतर हे प्रस्ताव परिपूर्ण आहेत किंवा नाही, याची तपासणी करून शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. दस्तऐवज चुकीचे आहेत काय, याची तपासणी शाळा-महाविद्यालयाच्या स्तरावरच होणे शक्य आहे. ४५ हजार प्रस्ताव एकटा अधिकारी तपासू शकत नाही, असे अकोल्याचे सामाजिक न्याय विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद चव्हाण यांनी सांगितले.