शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

VIDEO : सावरघर... पाच हजार झाडांचं एक गाव !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 6:08 PM

ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे.

 - अजय जाधव

उंब्रज (सातारा) - ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. या गावात विविध प्रकारची तब्बल पाच हजार झाडे लावण्यात आली असून, ग्रामस्थांच्या एक तपापासून सुरू असलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाला ख-या अर्थाने फळे येऊ लागली आहेत.पाटण तालुक्यातील मुरुड येथे तारळी नदीवर धरण बांधण्यात आले. या धरणाच्या निर्मितीसाठी शासनाने परिसरातील अनेक गावांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले. त्यापैकी क-हाड तालुक्यातील चोरे गावालगत वसवण्यात आलेले सावरघर हे एक गाव. ओसाड माळरानावर वसवले असूनही या गावातील सर्व ग्रामस्थांनी ‘गाव करी ते राव काय करी’ या उक्तीप्रमाणे एकीच्या माध्यमातून हे माळरान हिरवेगारकेले आहे.आजही या गावाला पिण्याचे हक्काचे पाणी मात्र उपलब्ध नाही.  पुनर्वसन असल्यामुळे गावनिर्मितीसाठी प्लॉटची निर्मिती करताना शासनाने सर्व नियमाचे पालन केलेले आहे. यामुळे अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, मोकळी जागा, यामुळे मिळालेल्या प्लॉटवर लोकांनी घरे बांधली. रिकाम्या जागेत झाडे जगवली. या गावाचा फक्त बेचाळीस घरांचा उंबरा. या गावची लोकसंख्या सुमारे २५० च्या दरम्यान. तारळे परिसर हा डोंगराळ; पण निसर्गाच्या सान्निध्यात असलेला भाग.  पाणीदार व झाडाझुडपांमुळे कायमचा हिरवागार. अशा निसर्गाच्या सान्निध्यात जन्मलेल्या सावरघर ग्रामस्थांना या ओसाड माळरानावर राहणे अशक्य होते; पण त्यांनी हे पुनर्वसन स्वीकारले. हेच माळरान हिरवेगार करण्याचा चंग बांधला. शासनाच्या रोजगार हमी योजना, ग्रामपंचायतीचा पर्यावरण निधी व ग्रामस्थांनी स्वत:च्या खर्चातून गावातीलरस्त्यालगत, रिकाम्या जागेत झाडे लावण्यास सुरुवात केली.गावातील प्रत्येक घर हे नियोजन बद्धच बांधलेले आहे. घराला अंगण व परसदारी आहे. या रिकाम्या जागेत फळझाडे आणि फुलझाडे लावलेली आहेत. यामध्ये आंबा, फणस, बदाम, पेरू, चिकू, डाळिंब, अंजीर, नारळ अंजीर, सीताफळ, रामफळ अशी फळझाडे आहेत व सुगंध देणारी फुलझाडेही लावलेली आहेत. अशा खासगी मालकीच्या जागेत सुमारे दोन हजार झाडे आज बहरलेली व हिरवीगार दिसत आहेत.आता सर्वत्र उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत; पण ऐकेकाळी भकास व उजाड माळरान असलेल्या जागेतील या गावात आता प्रवेश करताच पक्ष्यांच्या किलबिलाटानेच स्वागत होत आहे. हिरवीगार सावली मन प्रफुल्लित करत आहे. मात्र आजही हे गाव चोरे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीवर पिण्याचे पाणी भरते. गाव हिरवेगार करणारे हे ग्रामस्थ मात्र गेली १६ वर्षे पिण्यासाठी हक्काचे पाणी मागत आहे; पण तारळी धरणाच्या पाण्यातून हजारो एकर जमीन ओलिताखाली येण्यासाठी स्वत:ची घरदार, जमीन जुमला त्याग करणा-याया गावाला आजही हक्काचे पिण्याचे पाणी नाही. केवढी ही शोकांतिका. गावातील शिवगणेश मंडळ त्याचबरोबर सुहास पाटील, जगन्नाथ पाटोळे, परशूराम सपकाळ, अंकुश सप्रे, रामदास बाबर, नवनाथ बाबर, दिनकर संकपाळ, संतोष संकपाळ, राम जाधव यांसह ग्रामस्थांची पर्यावरण संवर्धनाची ही धडपड अखंडपणे सुरूच आहे.

संवर्धनाचे एक तप पूर्णदरवर्षी ५०० हून अधिक झाडे लावायची. ती जगवायची. हे ठरवूनच झाडे लावली जाऊ लागली. झाडे लावत असताना दोन झाडांमध्ये ठराविक अंतर सोडण्यात येत होते. यामुळे ही झाडे जगलीच; पण त्यामुळे शोभाही वाढली. सलग बारा वर्षे या ग्रामस्थांनी ही झाडे लावली व जगवलेली आहेत.

अशोक, शिवर, गुलमोहर वाढवतोय शोभारस्त्याच्या दोन्ही बाजूला गुलमोहर, रेनट्री, पाम, अशोक , शिवर, कडुनिंब, निलमोहर, निलगिरी, सप्तपर्णी अशी शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. तसेच रानटी आणि सावली देणारी झाडे ही लावलेली दिसून येत आहेत.

ठिबकने दिले पाणीया परिसरात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची वानवा. त्यातच झाडांना पाणी कोठून आणायचे? हाच मोठा प्रश्न होता. परंतु यावर तोडगा काढून अनेकांनी ठिबक करून पाणी दिले. प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या घरासमोर असणा-या झाडांच्या जगण्यासाठी धडपडत आहे. त्याला खतपाणी देत आहे. सार्वजनिक जागेतील मंदिर परिसरात लावलेल्या आंबा, नारळ यासारख्या फळझाडांना फळेही येऊ लागली आहेत.

टॅग्स :forestजंगलSatara areaसातारा परिसरMaharashtraमहाराष्ट्र