महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 13:09 IST2025-10-25T13:08:44+5:302025-10-25T13:09:51+5:30
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने हा फरार असून बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बनकर याच्या बहिणीने मोठा गौप्यस्फोट केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप करत, तसेच प्रशांत बनकर या तरुणावर मानसिक, शारिरीक छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे. या प्रकरणात पीएसआय गोपाल बदने हा फरार असून बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात बनकर याच्या बहिणीने मोठा गौप्यस्फोट केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...
दरम्यान, प्रशांत बनकर याच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी शुक्रवारी पोलिस स्टेशनलाच थांबवून ठेवण्यात आले होते. प्रशांतला कुठून अटक करण्यात आली नाही तर तो स्वत:हून घरात हजर झाला, तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे प्रशांतच्या भावाने सांगितले आहे. टीव्ही९ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
याचबरोबर प्रशांतच्या बहिणीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मी घरी आले की डॉक्टरला भेटायचे. ती आमच्याकडे रहायला होती.आमची एवढी मैत्री झाली होती, की ती सर्व मला सांगायची. मी नोकरी करायचे. मी तिला म्हणायचे की तुला चांगला सरकारी जॉब आहे. त्यावर ती म्हणालेली की आमच्या नोकरीत खूप तणाव आहे. ती खूप तणावातच असायची. या महिन्यात प्रशांत आठ दिवसांसाठी घरी आला होता. तो तिच्याशी घरातल्यांसारखेच बोलायचा. पुण्याला आला तेव्हा तिने त्याला मेसेजवर प्रपोज केला होता. त्यावर भावाने नाही मॅडम मी तुम्हाला घरातल्यासारखे मानतो, तुम्ही मला दादा म्हणता, असे म्हणत नकार दिला होता, असा गौप्यस्फोट प्रशांतच्या बहिणीने केला आहे.
तसेच तो जर त्यांचा मानसिक छळ करत होता तर त्या लक्ष्मीपूजनवेळी आलेल्या, त्यांचे आई-वडील आलेले तेव्हा का नाही सांगितले. माझ्या भावाने तिला नाही म्हटले म्हणून तिने नाव घेतले आहे. त्याने तिला आधीच स्पष्ट केले होते व संपर्कात नव्हता, असा दावा प्रशांत बनकरच्या बहिणीने केला आहे.