ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 19:29 IST2025-09-30T19:28:45+5:302025-09-30T19:29:47+5:30
...अशा वेळेला लोकांच्या मनात असेल, तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर ही चांगली आणि सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी.

ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
मुंबई - राज्यात आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करता, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दसरा मेळाव्यात (शिवसेना ठाकरे गट) आपली युती जाहीर करू शकतात, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ठाकरे बंधूंच्या या युती संदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. 'ठाकरे बंधूंचे दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदान-प्रदानही होऊ शकते. दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, असे राऊतांनी म्हटले आहेत. ते पत्रकारांशी बोलत आहेत.
दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदानप्रदानही होऊ शकते -
संजय राऊत म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत. अनेक विषयांवर चर्चा करत आहेत. एकमेकांसोबत संवाद साधत आहेत. विचारांची देवाणघेवाण करत आहेत. दसऱ्याला वैचारिक सोन्याचे आदानप्रदानही होऊ शकते. अशा वेळेला लोकांच्या मनात असेल, तुमच्या मनात हा प्रश्न असेल, तर ही चांगली आणि सकारात्मक चर्चा लोकांमध्ये असायला हवी.
आपल्याकडे अशी कोणतीही माहिती आली - -
दरम्यान मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी आपल्याकडे अशी कोणतीही माहिती आली नसल्याचे म्हटले आहे. ते एबीपी माझा सोबत बोलताना ते म्हणाले, "मी संजय राऊतांच्या वक्तव्याचा आदर करतो. मात्र, आमच्यापर्यंत तरी, एक महाराष्ट्र सैनिक म्हणून अशी कोणती बातमी आलेली नाही. तुमच्याच माध्यमातून कळत आहे की, असे असे होणार आहे. पण पक्षाकडून असा काही आदेश अद्याप आलेला नाही आणि आमच्या पक्षाकडून काही निर्णय घ्यायचा असेल, तर राज ठाकरेच घेतील.