शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:21 IST2026-04-05T13:18:26+5:302026-04-05T13:21:00+5:30

Baramati Rahuri Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी विरोधकांकडून मोर्चेबांधणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

sanjay raut told about discussion between sharad pawar and uddhav thackeray over baramati rahuri bypoll elections 2026 | शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?

शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?

Baramati Rahuri Bypoll Election 2026: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा झाली. राहुरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांच्या पक्षाची बैठक आहे. जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संवाद सुरू आहे. यात शिवसेनेची भूमिका थोडी कमी आहे. कारण बारामतीची जागा आम्ही लढलेलो नाही. ती जागा शरद पवारांच्या पक्षाची आहे. राहुरीची जागा शरद पवारांच्या पक्षाची आहे. त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

बारामती मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन केले. परंतु, काँग्रेस मात्र बारामती पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे म्हटले जात आहे. उलट बारामतीत शरद पवार गट उमेदवार देणार असेल, तर काँग्रेस पाठिंबा देईल, असा प्रस्तावही देण्यात आला आहे. त्यामुळे काही झाले तरी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. 

राहुरीत उद्धवसेनेचे तीन उमेदवार इच्छूक पण...

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राहुरीत आमच्या पक्षाकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. आमच्याकडे इच्छुक असले तरी महाविकास आघाडी म्हणून निर्णय घ्यावा लागेल. प्राजक्त तनपुरे हे तिकडचे माजी आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागची निवडणूक लढवलेली आहे. त्यावर निर्णय घेऊ. काँग्रेस पक्ष त्यानंतर राहील. पहिली संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. कारण त्यांच्या वाटेला आलेली ही जागा आहे. काँग्रेस पक्षाचे त्या मतदारसंघात प्राबल्य आहे. आमच्याकडे तीन उमेदवार आहेत. ही निवडणूक होणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

दरम्यान, बारामती लोकसभा आणि विधानसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाकडेच राहिली आहे. याहीवेळी तेथील पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी त्यांचा उमेदवार द्यावा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 'लोकमत'शी बोलताना मांडली. शरद पवार उमेदवार देणार नसतील तर आम्ही काँग्रेसचा उमेदवार बारामतीमध्ये उभा करू, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार लढत असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावर, महाराष्ट्रात यापूर्वी मोठ्या नेत्याच्या निधनानंतर त्यांचे वारस उभे राहिले तेव्हा निवडणूक झाली होती, मग आताच बिनविरोध का? असा सवाल सपकाळ यांनी केला.

 

Web Title : पवार-ठाकरे ने बारामती-राहुरी उपचुनाव पर चर्चा की; क्या है रणनीति?

Web Summary : पवार और ठाकरे ने बारामती-राहुरी उपचुनाव पर चर्चा की। महायुति निर्विरोध चुनाव चाहती है, लेकिन कांग्रेस लड़ने पर अड़ी है। राहुरी पर फैसला पवार की पार्टी करेगी, हालांकि उद्धव सेना के उम्मीदवार इच्छुक हैं। कांग्रेस बारामती में पवार के उम्मीदवार का समर्थन कर सकती है या अपना उम्मीदवार उतार सकती है।

Web Title : Pawar-Thackeray discuss Baramati-Rahuri bypolls; what's the strategy?

Web Summary : Pawar and Thackeray discussed the Baramati-Rahuri by-elections. While the Mahayuti seeks unopposed elections, Congress insists on contesting. The decision for Rahuri rests with Pawar's party, though Uddhav Sena has interested candidates. Congress may support Pawar's candidate in Baramati or field their own.