शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
3
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
4
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
5
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
6
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
7
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
8
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
9
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
10
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
11
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
12
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
13
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
14
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
15
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
16
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
17
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
18
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 14:57 IST

Sanjay Raut News: जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut News: शेतकऱ्यांना अद्यापही मदत पोहोचली नाही. दिवाळीच्या आधी जनतेला , शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर जनतेबरोबर रस्त्यावर उतरू. जनतेच्या , शेतकऱ्याच्या प्रश्नांवर या विषायवर शिवसेना प्रचंड मोठा मोर्चा काढणार आहे, त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेनेचा हा भव्य मोर्चा असेल. यापूर्वी ११ ऑक्टोबरला मराठवाड्यात शिबीर होणार होतं. मात्र या परिस्थिती ते शिबीर घेणे शक्य नाही. म्हणून सर्व जिल्ह्यातून  शेतकरी एकत्र येणार होते, त्याचे रुपांतर मोर्चात व्हावे  आणि आपल्या मागण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवावा असे ठरले, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासनही त्यापेक्षा असंवेदनशील आहे, प्रशासनावर कोणताही धाक नाही. सरकारने आम्हाला तुटपुंजी मदत पाठवली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की ती मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतील अशी शेतकऱ्यांनी भूमिका आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. 

PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा

उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. ते अनेक गावात गेले, घरात गेले, बांधाच्या पलीकडेही गेले. शेतकरी त्यांची वाट पहात होते, महिला, लहान मुले, वृद्ध, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय हे सगळे उद्धव ठाकरेंची वाट पहात होते. मराठवाड्याचे , शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. ३६ लाख शेतकरी आणि त्यांची कुटुंबे हवालदिल आहेत, आजही त्यांना निवारा नसल्यामुळे ते निर्वनासितासारखे राहत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ व्हावी, पीएम केअर फंडातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन पंतप्रधान मोदी यांना भेटावे. मराठवाड्यातील , महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ते सांगावे. घरात पाणी शिरले आहे. शेतात नदीचा प्रवाह वळला, शेती, जमीन राहिलीच नाही. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना कृतज्ञतापूर्वक सांगितले की, आपण जी कर्जमाफी केली, त्याच्याआधारे आम्ही इथपर्यंत आलो आहोत, आता पुन्हा कर्जमाफी केली नाही तर जगणे कठीण होईल असे शेतकरी सांगतात, असे राऊत यांनी म्हटले आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Raut Demands PM CARES Fund to Waive Maharashtra Farmers' Loans

Web Summary : Sanjay Raut warns of protests if farmers don't receive aid. Uddhav Thackeray will lead a massive march for farmers' demands, urging PM CARES Fund for Maharashtra's debt relief after flood devastation. Farmers face dire conditions, seeking loan waivers for survival.
टॅग्स :RainपाऊसfloodपूरSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे