'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:28 IST2025-05-30T16:27:19+5:302025-05-30T16:28:58+5:30
Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: खासदार संजय राउत यांनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करत भाजपवर निशाणा साधला.

'पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी BJP मध्ये सामील होतील, म्हणूनच...', संजय राऊतांची बोचरी टीका
Sanjay Raut on Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. पण, अद्याप निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडणारे हल्ल्यातील प्रमुख दहशतवादी पकडले गेलेले नाहीत. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहिम राबवली आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावरुन शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.
मीडियाशी संवाद साधताना शुक्रवारी संजय राऊत यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा केला. ते म्हणाले की, 'पहलगाम हल्ल्यातील सहा दहशतवादी अद्याप पकडले गेले नाहीत, कारण एक दिवस तुम्हाला भाजप कार्यालयातून एक प्रेस नोट मिळेल, ज्यामध्ये असे म्हटले जाईल की, ते सहाजण भाजपमध्ये सामील झाले आहेत,' अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.
#WATCH | Mumbai: Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "The six terrorists of the Pahalgam attack are not being caught because one day you might get a press note from the BJP office saying those six people have joined the BJP." pic.twitter.com/oR3BpugaaW
— ANI (@ANI) May 30, 2025
सरकारच्या शिष्टमंडळावर राऊतांची टीका
अलीकडेच संजय राऊत यांनी सरकारच्या शिष्टमंडळावरही टीका केली होती. म्हणाले होते की 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्राने खासदारांचे बहुपक्षीय शिष्टमंडळ अशा अनेक देशांना भेट देण्यासाठी पाठवले आहे, ज्यांचा भारत-पाकिस्तान मुद्द्याशी काहीही संबंध नाही. सरकारला वास्तवापेक्षा दिखाव्यामध्ये रस आहे. भारत-पाकिस्तान मुद्द्याशी काहीही संबंध नसलेल्या देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवण्याची काय गरज आहे? लायबेरिया, काँगो आणि सिएरा लिओन सारख्या देशांची निवड गंभीर प्रश्न उपस्थित करते. ते शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा संदर्भ देत होते.
पहलगाम हल्ल्यातील मारेकरी अद्याप फरार
गेल्या महिन्यात 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे फिरायला आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारुन सहा दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. हा हल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचीच एक संघटना टीआरएफच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. केंद्राने याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे नष्ट केले. याशिवाय, पाकिस्तानला कोंडीत पकडण्यासाठी आणि त्याचा दहशतवादी चेहरा जगसमोर आणण्यासाठी विविध प्रकारे कारवाई केली जात आहे.
'...तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते', राजनाथ सिंह यांचा INS विक्रांतवरुन मोठा खुलासा