शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांना मनसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 14:44 IST

Sanjay Raut : मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची राऊत यांची वेळ आलीये की काय असं वाटत आहे. आम्हाला तुमची चिंता आहे. महापालिकेनंही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांचं कार्यालय सुरू करावं," असं म्हणत शेलार यांनी टोला लगावला.

ठळक मुद्देसामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं साधला होता भाजपावर निशाणाशिवसेनेच्या भाषेवरून प्रतिक्रिया देण्याऐवजी किव येते, शेलारांची टीका

ईडीच्या चौकशीवरून शिवसेना आणि भाजपा हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. ईडीची चौकशी आणि भाजपा नेत्यांनी घटनेची करून दिलेली आठवण यावरून शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर घणाघाती टीका केली होती. सीबीआय आणि ईडीसारख्या संस्थांचं अध:पतन सध्या जोरात सुरू आहे. हवाबाण थेरेपीचा अतिरेक झाला की डोक्यात सडकी हवा जाते. त्या हवेच्या ढेकरा सध्या ज्यांना लागत आहेत त्यांचे नाव भाजपा. भाजपाच्या नव्या घटना समितीचा विजय असो. डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य, असा टोला शिवसेनेने सामनामधून भाजपाला लगावला होता. यानंतर भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करत संजय राऊत यांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज असल्याचं म्हटलं आहे."ज्या प्रकारची भाषा शिवसेना आणि सामनाच्या अग्रलेखातून येत आहे, त्यावर प्रतिक्रिया देण्याऐवजी किव करावी असं वाटायला लागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुविद्य, सुविचार आणि संस्काराचा शिवसेनेनं कधीच ऱ्हास केला आहे. आज ते सत्तेत बसल्याचं दुर्देवही महाराष्ट्र पाहतोय," असं म्हणत त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला."संजय राऊत यांना नोटीस मिळाल्यापासून ज्या पद्धतीनं लिखाण ते करत आहेत. मनापासून त्यांना एक सल्ला द्यावासा वाटतोय. त्यांनी मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची त्यांची वेळ आलीये की काय असं वाटत आहे. आम्हाला तुमची चिंता आहे. महापालिकेनंही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांचं कार्यालय सुरू करावं," असं म्हणत त्यांनी टोला लगावला.काय म्हटलंय अग्रलेखात?सध्या महाराष्ट्रात ईडी प्रकरण गाजत आहे. महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. आता ईडीला घाबरून भाजपाच्या कळपात शिरलेल्या एका महात्म्याने ठाकरे सरकार पडण्याचा नवा मुहुर्त सांगितला आहे. आता म्हणे मार्च महिन्यात काही झाले तरी सरकार पडणार हा मुहुर्त त्यांनी ईडीपिडीच्या पंचांगातून काढला की, त्यांना दृष्टांत झाला, हा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, महाराष्ट्रातील भाजपावाले सत्तास्थापनेसाठी त्या ईडीवर फारच विसंबून राहिले आहेत.

ईडीची नोटिस आली की, चौकशीसाठी संबंधिताने जायलाच हवे. कायद्याचा सन्मान व्हायलाच पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी समान. दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस म्हणतात ते देखील बरोबरच आहे. कर नाही तर डर कशाला? त्यांचे हे सांगणे बरोबरच आहे. पण या नोटिसा देशभरात फक्त भाजपाविरोधकांना का येतात हा प्रश्न आहे. देशात फक्त भाजपवालेच गंगास्नान करतात आणि बाकीचे लोक गटारस्नान करतात, असे काही आहे काय? शिवसेनेच्या बाबतीत कर नाही तर डर नाही वगैरे ठिकच, पण करून सवरून नामानिराळे राहण्याची आमची अवलाद नाही. जे केले त्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्याचे उदाहरण म्हणजे बाबरी विद्ध्वंस. तेथे रणातून पळून गेले ते कर आणि डरचे दाखले देत आहेत. हा विनोदच म्हणावा लागेल. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग