'...आम्ही घाबरणार नाही', संजय राऊतांवर FIR दाखल झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 16:46 IST2023-12-12T16:45:42+5:302023-12-12T16:46:46+5:30
Sanjay Raut FIR: 'केंद्र सरकार हुकूमशाही सरकार बनले आहे. ईडी, सीबीआय, आयटी हे सरकारची शस्त्रे आहेत.'

'...आम्ही घाबरणार नाही', संजय राऊतांवर FIR दाखल झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींची टीका
Priyanka Chaturvedi on Sanjay Raut FIR: शिवसेनेचे (उबाठा) मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह लेखामुळे वाद वाढला आहे. याप्रकरणी भाजप नेत्याने यवतमाळमध्ये खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ भाजपचे निमंत्रक नितीन भुतडा यांनी पोलिस ठाण्यात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. राऊतांनी 11 डिसेंबर रोजी 'सामना'मध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आक्षेपार्ह लेख लिहिल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या लेखाद्वारे वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी राऊतांविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात कलम 153 (अ), 505(2) आणि 124(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#WATCH दिल्ली: 'सामना' में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ कथित आपत्तिजनक लेख लिखने के लिए सोमवार को राज्यसभा सांसद संजय राउत के खिलाफ मामला दर्ज़ करेन पर शिवसेना (UBT) की सांसद प्रियंका चतुर्वेदी ने कहा, "सरकार इतनी तानाशाही हो गई है कि कोई भी इनके खिलाफ बोले तो उन पर केस… pic.twitter.com/T60jxGtVlm
— ANI_HindiNews (@AHindinews) December 12, 2023
प्रियंका चतुर्वेदींची टीका
संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना (उबाठा) खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी केंद्र सरकारवर टीका केली, "केंद्र सरकार इतके हुकूमशाही बनले आहे की, कोणीही त्यांच्याविरोधात बोलल्यावर थेट गुन्हा दाखल केला जातो, तुरुंगात टाकले जाते. ईडी, सीबीआय, आयटी हे सरकारची शस्त्रे आहेत, याद्वारे विरोधकांना शांत केले जाते. पण, आम्ही आमचे काम राहू. अशा तक्रारींना आम्ही घाबरत नाही," असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.