शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संजय जोशींनी घेतली सरसंघचालकांची भेट

By admin | Updated: May 29, 2015 01:21 IST

गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपा नेते संजय जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेले भाजपा नेते संजय जोशी यांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. संजय जोशी यांच्या ‘घरवापसी’साठी संघासह भाजपातील अनेक पदाधिकारी पडद्याआडून प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सरसंघचालकांशी झालेल्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात व विशेषत: भाजपातील अंतर्गत गोटात चर्चांना ऊत आला आहे.संजय जोशी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक मानले जातात. गुजरात भाजपामध्ये एकेकाळी खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मोदी व जोशी यांच्यात कालांतराने वितुष्ट आले व यातूनच जोशी हे राजकीय परिघाबाहेर गेले. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्ली व नागपूर येथे संजय जोशी यांची ‘घरवापसी कधी’ असे प्रश्न उपस्थित करणारे ‘पोस्टर्स’ लागले होते. परंतु मोदी हे माझे नेते असल्याचे सांगत जोशींनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संजय जोशी यांनी सरसंघचालकांची गुप्त भेट घेतली. मुख्यालयातील अनेक जणांना याची कल्पना नव्हती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकले नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट सुमारे १५ मिनिटे चालली. संजय जोशींनी संघटन उभारण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. नागपूर तसेच नवी दिल्लीसोबतच भाजपात राष्ट्रीय पातळीवर त्यांचे मोठ्या प्रमाणावर पाठिराखे आहेत. कुशल संघटक असलेल्या संजय जोशी यांना पक्षात सन्मानाचे पद मिळावे म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या ‘घरवापसी’ची चर्चा होत असताना आता त्यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्यामुळे ही त्यांच्या पुनर्वसनाची तयारी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)भेटीमागे दडले काय? : मागील पंधरवड्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येलाच संघाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे ‘रिमाईंडर’ दिले. अशा स्थितीत संजय जोशी यांच्याशी झालेल्या भेटीचे मागील भेटींशी तर काही ‘कनेक्शन’ नाही ना, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.