आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 16:08 IST2025-07-09T16:08:04+5:302025-07-09T16:08:21+5:30

MLA's residence hostel Clash: आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणी सुरु असताना आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भिडले.

Sanjay Gaikwad MLa Canteen news: Clashes again in the canteen of the Akashwani MLA's residence hostel; No MLA today, two waiters clash... | आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले...

आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले...

एकीकडे शिळ्या वरणावरून शिवसेनेचे आमदारसंजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कँटीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असताना आज पुन्हा याच कँटीनमध्ये दोन वेटरमध्ये जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे. तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी मध्यस्थी या दोन वेटर बाजुला केले. परंतू, आता या आमदारा निवासाच्या कँटीनमध्ये काय चालले आहे हे समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत. 

आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणी सुरु असताना आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपसात भिडले.  किरकोळ वादातून या दोन्ही वेटरनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली होती. या वादात काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. कालच्या राड्यानंतर आता कँटीनमधील कर्मचाऱ्यांमध्येच मारामारीचे प्रकार घडू लागल्याची चर्चा होती. 

कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी दाखल
दरम्यान, आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील निकृष्ट जेवण आणि मारहाणीच्या घटनेनंतर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) सक्रीय झाले आहे. एफडीएचे अधिकारी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये दाखल झाले असून, त्यांनी कॅन्टीनमधील सर्व गोष्टींची आणि अन्नाची कसून तपासणी सुरू केली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या तक्रारीनंतर आणि मारहाणीच्या माहितीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यामुळे आता या कॅन्टीनच्या अन्नसुरक्षेबाबत धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Web Title: Sanjay Gaikwad MLa Canteen news: Clashes again in the canteen of the Akashwani MLA's residence hostel; No MLA today, two waiters clash...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.