शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटी झाडांवरील संत्री धोक्यात

By admin | Updated: August 17, 2014 00:46 IST

अस्मानी आणि सुलतानी संकटाने वऱ्हाडातील शेतकरी हतबल झाला असताना अचानक बेसुमार गळती लागल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी झाडांवरील संत्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

बेसुमार गळती : संत्रा उत्पादक हादरला, हार्मोनल इम्बॅलन्सचा अमरावती जिल्ह्यात परिणामसचिन सुंदरकर/ सुनील देशपांडे - अमरावतीअस्मानी आणि सुलतानी संकटाने वऱ्हाडातील शेतकरी हतबल झाला असताना अचानक बेसुमार गळती लागल्याने जिल्ह्यातील सुमारे दीड कोटी झाडांवरील संत्री नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राज्याचे कृषिमंत्री हेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यातील कृषी खाते बघ्याच्या भूमिकेत आहेत. अंबिया बहाराची संत्री डोळ्यांदेखत नामशेष होताना बघून वऱ्हाड वैभव फुलविणारा अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदार पुरता हादरला आहे. विदर्भात संत्र्यासाठी नागपूर ओळखले जात असले तरी चविष्ट व दर्जेदार संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन अमरावती जिल्ह्यातच होते. अमरावती जिल्ह्याला विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ असेही म्हटले जाते. अमरावती जिल्ह्यात संत्र्याचे लागवड क्षेत्र ५५ ते ६० हजार हेक्टर एवढे आहे. झाडांची संख्या दीड कोटींपेक्षा अधिक आहे. यंदाच्या खरीप हंगामात पाऊस लांबणीवर पडल्याने वातावरणात बदल झाला. झाडातील सुक्ष्म द्रव्यांचे संतुलन बिघडले. त्यामुळे अचानक संत्रा फळांची गळ होऊ लागली. संत्रा गळतीचा वेग इतका जास्त आहे की स्थिती आटोक्यात आणली न गेल्यास दोनेक आठवड्यात बागा फळरहीत होतील. अचलपूर तालुक्यात २ हजार २१३ हेक्टर क्षेत्रातील संत्र्यावर मृगबहाराची फळे आहेत. ८ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात आंबिया बहाराची फळे आहेत. फळगळतीचा फटका अचलपूर तालुक्यातील चमक, नायगाव, भिलोना, बोपापूर, खोजनपूर, देवरी, तुळजापूर व परिसरातील भागात तीव्र आहे. हीच स्थिती मोर्शी आणि वरुड तालुक्यांतही आहे. वरुड तालुक्यात सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रात फळधारणा करणारी झाडे आहेत. चांदूरबाजार तालुक्यातील अनेक बागा फळरहीत झाल्या आहेत. महसूल व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांसमक्ष व ग्रामसभेच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.