शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

आषाणे रस्त्यासाठी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: August 24, 2016 03:00 IST

कर्जत तालुक्यातील आषाणे -ठाकूरवाडी रस्त्याबाबत येथील आदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यातील आषाणे -ठाकूरवाडी रस्त्याबाबत येथील आदिवासी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून या रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या रस्त्याबाबत ‘लोकमत’ने आवाज उठवला होता. या रस्त्याबाबत वस्तुस्थितीचे दर्शन घडवणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर बातमी चुकीची असल्याचा कांगावा केला. मात्र आदिवासी ग्रामस्थांनी या बातमीला दुजोरा देत ही बातमी खरी असून ठाकूरवाडी रस्ता झालेला नाही असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच मंजूर रस्त्याचे बांधकाम सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.या रस्त्याबाबत मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक कार्यालय मुंबई, अधीक्षक अभियंता, रायगड सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन यांना लेखी निवेदन दिले असून त्यावर ८० ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली तरी रस्ता नाही. वाडीतील ३०० ग्रामस्थांचे रस्त्याअभावी हाल होत आहेत. कुणी आजारी असल्यास त्याला झोळी करून पायवाटेने डोंगर माथ्यावरून खाली आणावे लागते. विद्यार्थ्यांना नेरळ येथे शिक्षणासाठी दोन तास पायपीट करीत यावे लागते. या रस्त्याबाबत शासकीय मंजुरी आदेश २८ आॅगस्ट २०१४ रोजी निर्गमित आहेत. मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी रस्त्यांचे काम झाले नाही.रस्त्याबाबत आदिवासी बांधवांनी आधी रस्ता दाखवा अशी रोखठोक भूमिका घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाची चांगलीच पंचाईत झाली आहे. हा रस्ता तांत्रिक मंजुरी प्राप्त झाल्यानंतर कार्यारंभ आदेशानुसार बांधून पूर्ण केला असल्याचे सा.बां. विभाग सांगत आहे. जर हा रस्ता पूर्ण केला आहे तर मग तो आषाणेपासून ठाकूरवाडीपर्यंत असायला हवा. मात्र प्रत्यक्षात हा रस्ता झालेलाच नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता चंद्रशेखर सहनाल यांच्याशी अनेकवेळा संपर्क करूनही आषाणे -ठाकूरवाडी रस्त्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कार्यालयात अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कार्यालयात नसल्याचे अनेक वेळा दिसून आले. >सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामाचा बोजवाराकर्जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक कामांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आधीच प्रसिद्धी माध्यमांच्या रडारवर असलेल्या बांधकाम विभागास स्थानिक जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. ‘लोकमत’ने २२ जून रोजी आषाणे -ठाकूरवाडी या केवळ कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या रस्त्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारी बातमी प्रसिद्ध केली आणिशासकीय गोटात एकच खळबळ उडाली. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून होत आहे.>आषाणे ते ठाकूरवाडी हा रस्ता कागदोपत्री पूर्ण आहे. आषाणे भागात काही काम झाले. आषाणे गावापासून ठाकूरवाडीपर्यंत वन विभागाची जागा असल्याने हे काम अर्धवट आहे. जर रस्ता पूर्ण झालाच नाही तर बांधकाम पूर्ण असल्याचे प्रमाणपत्र कुठल्या आधारे दिले आहे.- गो. रा. चव्हाण, माहिती अधिकार कार्यकर्ते, डिकसळ