शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीराजेंचा पुन्हा तावडेंना सल्ला : प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 15:45 IST

कोल्हापूरकरांसाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत मदत मागितल्याप्रकरणी खासदार संभाजीराजे आणि तावडे यांच्यातील वाद बुधवारी आणखीनच पेटला आहे. संभाजीराजेंना तावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरा, असा सल्ला आज दिला आहे.

ठळक मुद्देसंभाजीराजेंचा पुन्हा तावडेंना सल्ला : प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरावाद पुन्हा पेटला : ट्विटरवर दिले उत्तर

कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत मदत मागितल्याप्रकरणी खासदार संभाजीराजे आणि तावडे यांच्यातील वाद बुधवारी आणखीनच पेटला आहे. संभाजीराजेंना तावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरा, असा सल्ला आज दिला आहे.मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत पूरग्रस्तांसाठी मुंबईत मदत मागितल्याच्या व्हिडिओ पाहून खासदार संभाजीराजे यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाच्या भिकेची गरज नाही, महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी याविषयी संताप व्यक्त केला होता.

यावर तावडे यांनी ट्विटरवर संभाजीराजेंना प्रत्युत्तर देत बोरिवलीतील रिक्षावाले, फेरीवाले यांच्या सामान्य नागरिकांनी जमा केलेला निधी पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात असताना, ही रक्कम संभाजीराजेंना भीक का वाटावी, असा सवाल केला. त्याला संभाजीराजेंनी पुन्हा ट्विटरवर उत्तर दिले आहे.

छत्रपती घराण्यांच्यावतीने एकच सल्ला, लोकनियुक्त मंत्र्यांनी हातात कटोरा घेउन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेउन फिरावे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाउन मदत पोहोचवावी. कोल्हापूर, सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांची ही स्पष्ट भावना आहे. पूरबाधितांना मदत देउन राज्यभरातील सामान्य जनतेने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याचा अभ्यास मंत्र्यांनी करावा, असा उपहासात्मक सल्लाही तावडे यांना त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीVinod Tawdeविनोद तावडेKolhapur Floodकोल्हापूर पूर