अहमदनगर : गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयावरील हल्ल्यानंतर फरार झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या १३ कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर समर्पण केले. शनिवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांच्यासह १३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. नगरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या परिसरात सकाळी कार्यकर्ते जमले होते़ बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधातील आंदोलनाला यश न आल्याने त्यांनी शिवाजी महाराजांची माफी मागत घोषणाबाजी केली़ त्यानंतर ते पोलिसांच्या वाहनात स्वत:हून बसले़ शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}