शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या चौकशीची शक्यता, पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 14:33 IST

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सांगली - कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. भिडे गुरुजी यांची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीमध्ये दाखल झाल्याचे वृत्त आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी  झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद  3 जानेवारी रोजी महाराष्ट्रभर उमटले होते. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले होते. दरम्यान, या प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मिलिंद एकबोटे याला अटक करण्यात आली आहे. तर संभाजी भिडे यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

 कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे व त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक गुरुवारी दुपारी सांगलीत दाखल झाले. पथकाने पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागात दिवसभर तळ ठोकून शिवप्रतिष्ठान या संघटनेबद्दल चौकशी करुन माहिती घेतली. पण सायंकाळपर्यंत शिवप्रतिष्ठानच्या एकाही कार्यकर्त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात आले नव्हते. अडीच महिन्यापूर्वी कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली होती. या दंगलीत एका तरुणाचा बळी गेला. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दंगलीच्या निषेधार्थ महाराष्टÑ बंद पुकारला होता. या बंदला सांगलीसह अनेक राज्यांतील अनेक जिल्ह्यात हिंसक वळण लागले होते. कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे, मिलिंद एकबोटेसह तिघांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या आठवड्यात एकबोटेंना अटक झाली आहे. भिडे यांना अटक करावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी २६ मार्चला मुंबईत विधानभवनवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, तर दोन दिवसापूर्वी भिडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन, दंगलीला आंबेडकर जबाबदार असून, त्यांची चौकशी करुन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवप्रतिष्ठानने २८ मार्चला राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यापासून पुणे पोलीस तपासासाठी एकदाही सांगलीत आले नाहीत. तसेच साधी चौकशीही केली नाही. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यानंतर पथक गुरुवारी सांगलीत दाखल झाले. एलसीबीमध्ये हे पथक तळ ठोकून आहे. पथकाने दिवसभरात स्थानिक अधिकारी व कर्मचाºयांकडून शिवप्रतिष्ठान या संघटनेबद्दल माहिती घेतली. कोरेगाव-भीमा दंगल होण्यापूर्वी व दंगलीनंतर भिडे कुठे होते, याची गुप्त माहितीही पथकाने घेतली. २८ मार्चला निघणाºया मोर्चाविषयीही पथकाने माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत पथक थांबून होते. परंतु शिवप्रतिष्ठानच्या एकाही कार्यकर्त्याला चौकशीसाठी बोलाविले नाही. पथकातील अधिकाºयांची भेट घेतली, मात्र त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. 

भिडे शिराळ्यातपुणे पोलीस तपासासाठी सांगलीत दाखल झाले, त्यावेळी भिडे जिल्हा दौºयावर होते. २८ मार्चच्या मोर्चाचे नियोजन व रायगड येथे ३२ मण सोन्याचे सिंहासन बसविण्याबाबत त्यांनी शिराळा येथे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती. सोशल मीडियावरुन पुणे पोलीस आल्याचे वृत्त पसरताच अनेक कार्यकर्ते एकमेकांशी संपर्क साधून माहिती घेत होते. 

पुणे पोलिसांचे पथक सांगलीत आल्याचे प्रसारमाध्यमातून समजले. भिडेंसह आमच्या कोणत्याही कार्यकर्त्याला त्यांनी चौकशीसाठी बोलाविले नाही. स्थानिक पोलिसांनीही आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. पथक येणार असल्याची दोन दिवसापासून चर्चा सुरु होती. - नितीन चौगुले, कार्यवाह, शिवप्रतिष्ठान, सांगली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी